hitec summer solutions kokan marathi news 
कोकण

सावधान ! रत्नागिरीत 902 वाड्यांना बसणार झऴ...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : यंदा मोसमी पाऊस लांबल्यामुळे टंचाईची झळ कमी बसेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे; मात्र फेब्रुवारीच्या मध्यापासून उन्हाची काहिली वाढल्याने भविष्यात झळा तीव्र होऊ शकतात. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून तयार केलेल्या टंचाई आराखड्यात 445 गावांतील 902 वाड्यांना टंचाईची झळ बसू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी 15 कोटी 63 लाखाची मागणी शासनाकडे केली आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेत आमदार अडकल्यामुळे यंदा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यासाठी प्रशासनाला बराच कालावधी लागला. 9 फेब्रुवारीला रत्नागिरी तालुक्‍याचा आराखडा जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरु झाली. जिल्हा प्रशासनाकडून 15 कोटी 63 लाखाचा आराखडा शासनाकडे निधी तरतुदीसाठी पाठविण्यात आला आहे. यामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी 45 लाख 98 हजार रुपयांची तरतूद केली असून 86 गावांतील 234 वाड्यांना टॅंकरची गरज भासणार आहे.

सरकार स्थापनेत आमदार अडकल्यामुळे... 

34 टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाणी योजना दुरुस्ती टंचाई आराखड्यात घेतली जात आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही 236 योजनांसाठी 11 कोटी 57 लाख रुपयांची तरतूद केली आहे. विंधन विहिरींसाठी 2 कोटी 25 लाख रुपये असून 322 विहिरी खोदण्यात येणार आहेत. विहिरींचा गाळ काढण्यासाठी 32 वाड्यांचे प्रस्ताव असून 50 लाख रुपये ठेवले आहेत. खासगी विहिरी अधिग्रिहत करण्यासाठी 1 लाख 5 हजार रुपये, पुरक नळपाणी योजना दुरुस्तीसाठी 83 लाख 50 हजार रुपये लागणर आहेत. जिल्हा परिषदेने जिल्हा प्रशासनाकडे आराखडा पाठविला असून तो मंजूर होऊन शासनाकडे गेला आहे. त्यानुसार निधीची तरतुद केली जाईल. 

27 कोटीचा आराखडा बदलला 
गतवर्षीचा आराखडा 18 कोटी रुपयांचा होता. यंदा तो 27 कोटीपर्यंत बनविण्यात आला होता. त्यामध्ये सुमारे पावणेचारशे नळपाणी योजना दुरुस्तीसाठी घेण्यात आल्या होत्या. तो आराखडा मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला; मात्र एवढा मोठा आराखडा मंजूर न करता तो दुरुस्तीसाठी पुन्हा जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. नवीन आराखड्यात पाणी योजना दुरुस्तीची सुमारे शंभरहून अधिक कामे वगळण्यात आली आहेत. 

तालुका * टंचाईग्रस्त वाड्या* खर्च * टॅंकरग्रस्त वाड्या 
मंडणगड* 39* 1 कोटी* 4 
दापोली* 139* 2 कोटी 21 लाख* 16 
खेड * 111 * 1 कोटी 92 लाख * 43 
गुहागर * 123* 1 कोटी 83 लाख * 3 
चिपळूण * 109* 1 कोटी 21 लाख * 62 
संगमेश्‍वर * 156* 2 कोटी 27 लाख * 42 
रत्नागिरी * 119* 2 कोटी 51 लाख * 46 
लांजा * 64* 1 कोटी 11 लाख * 13 
राजापूर* 42* 1 कोटी 53 लाख * 5 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT