कोकण

Tauktae cyclone: रात्र वैऱ्याची; मंडणगडात वाऱ्याचा धडका

सचिन माळी.

मंडणगड (रत्नागिरी) : निसर्ग चक्री वादळाच्या (Nisarg cyclone) कटू आणि भयानक आठवणी ताज्या असतानाच ता. १६ मे रोजी रात्री दहा वाजता मंडणगड (Mandangad) तालुक्यात तौक्ते वादळ घोंगावण्यास सुरवात झाली. सु सु करीत भयाण अंधारात घरांना धडका देणाऱ्या प्रचंड वाऱ्याच्या भीतीने डोळे छताकडे लागले होते. निसर्ग चक्री वादळाची आठवण करून देणारा तौक्ते वादळामुळे (Tauktae cyclone)घराघरात भेदरलेली मने एकमेकांना धीर देत होती. पुन्हा आपला संसार उघड्यावर पडणार तर नाही ना या विचाराने अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू टपकले. सुदैवाने तालुक्यात कोठेही मोठी दुर्घटना झाली नसल्याची प्राथमिक आश्वासक माहिती पुढे आली आहे.

Tauktae cyclone mandangad Ratnagiri district update marathi news

वर्षभरापासून निसर्ग चक्री वादळ, कोरोना याला सामोरे जात असतानाच तौक्ते वादळाच्या रुपात नवीन संकट ओढवले. तीन दिवसांपासून तालुक्यातील नागरिकांनी मागच्या अनुभवाच्या आधारे सुरक्षित होण्यासाठी हालचाली केल्या. घरांची दुरुस्ती करून घेतली. ता.१६ मे रोजी सकाळी वादळाने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केल्याच्या बातम्या धडकल्या आणि सर्वचजण सतर्क झाले.

जिल्ह्याचे शेवटचे टोक असणाऱ्या मंडणगड तालुक्यात गार वारे वाहू लागले. रिमझिम पाऊस पडू लागला. वादळ कुठे आले? कुठे आहे? इकडे किती वाजता येणार? असे प्रश्न जो तो एकमेकांना विचारू लागले. संध्याकाळी सात नंतर वाऱ्याचा वेग वाढला. मध्येच घोंगावणारा वाऱ्यामुळे मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वीज गायब झाली. रात्री दहानंतर तौक्ते वादळ वेळास किनाऱ्यापासून १२० किमी आत समुद्रातून जावू लागले. तुफान सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी यामुळे रात्रीच्या अंधारात भयाण वातावरण निर्माण झाले होते. घरांना धडका देणारा वारा सु सु आवाज करीत वाहू लागला. नारळ, फोपळ, आजूबाजूची झाडे वाकू लागली. निसर्ग वादळात मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडून गेल्याने यावेळी मोठी झाडे नसल्याने वारा घोंगावत राहिला नाही.

भीतीने नागरीकांनी रात्र जागून काढली. क्षणाक्षणाला वाढणारा वाऱ्याचा वेग मनाची घालमेल वाढवत होता. वादळाच्या आवाजात सरलेली रात्र मनात अनेक आठवणींचे कंगोरे उलगडवून गेली. पहाटेपर्यंत आपल्या डोक्यावरील घरांचे छत कायम राहिल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. निसर्गाचे आभार मानले. पहाटे स्थिरावलेला वारा सकाळी पुन्हा घोंगावू लागला. सोबत पावसाच्या मुसळधार सरी कोसळू लागल्याने हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. पुढील पाच तास महत्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tauktar cyclone mandangad Ratnagiri district update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT