कोकण

Tauktar cyclone: रत्नागिरी जिल्ह्यातील फत्तेगड,पाजपंढरी गावांचे स्थलांतर

राधेश लिंगायत

हर्णे (रत्नागिरी) : तौक्ते वादळ उद्या रत्नागिरी जिल्ह्यात धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून मिळताक्षणीच दापोलीच्या आपत्कालीन यंत्रणेने हर्णे फत्तेगड ग्रामस्थांना स्थलांतर होण्याच्या सूचना आज (ता.१५) सायंकाळी दिल्या. याप्रमाणे येथील ग्रामस्थांनी स्थलांतर व्हायला सुरुवात देखील केली.

Tauktar cyclone harne Ratnagiri district update marathi news

दरम्यान तौक्ते वादळ येणार म्हणून काल (ता.१४) मच्छीमारांनी ज्या ज्या खाडीत आसरा मिळेल तिथे आपल्या नौका हलवल्या आहेत. जयगड, दिघी, दाभोळ, आंजर्ले आदी खाड्यांचा आश्रय घेतला आहे. उद्या सकाळी वादळ रत्नागिरी जिल्ह्यात धडकणार असल्यामुळे प्रशासन मात्र सज्ज झाले. आणि थेट आपत्कालीन व्यवस्थापन हर्णे फत्तेगडावर पोहोचले. यावेळी पंचायत समिती अधिकारी महसूल, ग्रामपंचायत ,पोलीस खात्याचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले.

पप्पा तुम्ही कोरोनातून बरे झालात का? निरागस प्रश्‍नाने भावनाविवश

https://www.esakal.com/kokan/sharad-sagare-covid-fighter-mandangad-kokan-martahi-news

सदर ग्रामस्थांना एकत्रित केले. आणि वादळ कस येणार आहे त्याची तीव्रता किती आहे. याची माहिती दिली. येथील ग्रामस्थांनी आपल्या सुरक्षिततेसाठी हर्णे येथील एन. डी. गोळे हायस्कुलमध्ये स्थलांतर व्हायचे आहे. कोणाचे नातेवाईक असतील तर नातेवाईकांकडे जाण्यास हरकत नाही. सकाळी नऊ वाजायच्या आतच येथून सर्वांनी आपापली घरे खाली करायची आहेत अशी सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. त्याप्रमाणे हर्णे फत्तेगड येथील स्थलांतरास सुरुवात देखील केली. अशाच प्रकरच्या सूचना पाजपंढरी येथील किनारपट्टीलगतच्या ग्रामस्थांना देखील दिल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी देखील आपापल्या नातेवाईकांकडे जाण्यास सुरुवात केली आहे.

आज सायंकाळी ग्रामपंचायतीकडून ध्वनिक्षेपणकाद्वारे वादळाची सूचना देऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्यास सांगितले. फत्तेगड येथील ५० कुटुंबातील ६०० तर पाजपंढरीतील १२० कुटुंबातील ६२० लोकांना स्थलांतरीत केलं आहे. यावेळी जो तो आपापल्या वाहनाने व खर्चाने स्थलांतर झाला आहे. यावेळी शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही.

Tauktar cyclone harne Ratnagiri district update marathi news

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू राज्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT