जन आशीर्वाद यात्रेला जसजसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला, ते पाहून सरकार बिथरले आणि राणेंवर सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली
कणकवली : जन आशीर्वाद यात्रेला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वाढत्या प्रतिसादामुळे राज्य सरकार बिथरले आणि केंद्रीय मंत्री राणेंवर (narayan rane) अटकेची कारवाई करण्यात आली, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली (rajan teli) यांनी केली. दोन दिवसांत नियोजन होऊन जन आशीर्वाद यात्रा त्याच दिमाखात सुरू होईल, असेही ते म्हणाले.
येथील भाजप (BJP) कार्यालयात तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते. तेली म्हणाले, ‘‘जन आशीर्वाद यात्रेला (jan aashirvad yatra) जसजसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला, ते पाहून सरकार बिथरले आणि राणेंवर सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली; मात्र काहीही झाले तरी राणेंची जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. पुढील दोन दिवसांत यात्रेचे नवे वेळापत्रक जाहीर होईल. यात रत्नागिरी (ratnagiri) किंवा सिंधुदुर्गातून पुन्हा जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल.’’ (konkan News)
ते म्हणाले, ‘‘बांदा शहर पाण्याखाली गेले; मात्र पालकमंत्री तिकडे गेलेही नाहीत. चिपी विमानतळ अपूर्ण ठेवले. ‘सी वर्ल्ड’, नाणार ऊर्जा प्रकल्प, आडाळी एमआयडीसी या सर्वांना शिवसेनेकडून खीळ घातली गेली. त्यामुळे कोकणी जनतेला राणे यांच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. त्याअनुषंगानेच राणेंची जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्याचा जो प्रकार सत्ताधाऱ्यांनी चालविला आहे त्यालाही जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल. राणेंची ही संघर्ष यात्रा नाही तर आशीर्वाद यात्रा आहे. त्यामुळे या यात्रेत प्रशासनाकडून आडकाठी येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. केंद्रीय मंत्री राणेंच्या सुरक्षेसाठी आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत.’’
राणेंच्या अटकेसाठी सुडबुद्धी
केंद्रीय मंत्री राणे यांच्याबाबत घडलेला प्रकार हा पूर्वनियोजित होता. परिवहन मंत्री अनिल परब यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने हा सारा प्रकार आता जनतेसमोर आला आहे. परब हे राणेंच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे व्हीडिओत स्पष्ट दिसते. यावरून राणेंना झालेली अटक ही सुडबुद्धीने केल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोपही तेली यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.