Thackeray Shiv Sena Rajan Salvi esakal
कोकण

Ratnagiri Politics : ठाकरे सेनेचा 'हा' निष्ठावंत शिलेदार रत्नागिरीतून रिंगणात? भास्कर जाधवांना लोकसभेची ऑफर

आगामी २०२४ च्या विधानसभेची निवडणूक राजन साळवी रत्नागिरीतून लढण्याचे संकेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

विद्यमान आमदार उदय सामंत यांच्याविरोधात ठाकरे सेनेचा निष्ठावंत शिलेदार उभा करून जागा जिंकायचीच, असा पण ठाकरे गटाने केल्याचे समजते

रत्नागिरी : लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या रत्नागिरीतील बॅनरने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज (ता. ९) साळवी यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने शहरात ठिकठिकांणी मोठमोठे बॅनर झळकले आहेत.

‘शिवसेनेच्या वाघाची रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) एन्ट्री’, अशा आशयाचे हे बॅनर आहेत. यावरून आगामी २०२४ च्या विधानसभेची निवडणूक राजन साळवी रत्नागिरीतून लढण्याचे संकेत आहेत. विद्यमान आमदार राजन साळवी हे लांजा-राजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

परंतु, शिवसेनेत उभी फूट पडल्याने राज्यात मोठी उलथापालथ झाली. या धक्क्यातून ठाकरे सेना सावरत असताना महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अशीच फूट पडली. या घडामोडींमुळे ठाकरे सेनेची ताकद कमी होताना दिसत आहे.

आगामी २०२४ च्या निवडणुकांमध्ये आपले मतदारसंघ बांधून ताकद आहे तेथे मोठ्या मुसंडीने उतरण्याची तयारी ठाकरे सेनेने केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी मतदारसंघात वेगळी चाल ठाकरे सेना खेळणार असल्याचे समजते. यापूर्वी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना गुहागरऐवजी रत्नागिरीत आणण्याचा प्रयत्न सुरू होता.

परंतु, त्यांना बढती देऊन खासदारकीची तयारी करायला सांगितल्याची चर्चा आहे. उद्योगमंत्री उदय सामंत गेले चार वेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निवडून येत आहेत. त्यांची येथे मांड पक्की झाली आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेतून तुल्यबळ आणि रत्नागिरीत तेवढी लोकप्रियता असलेल्या उमेदवाराला उतरवण्याच्या हालचाली आहेत.

मात्र महाविकास आघाडी होणार असल्याने जिल्ह्यात एकतरी जागा काँग्रेसला द्यावी लागणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा लागेल असे दिसते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड या मतदारसंघातून इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा कमी मताने पराभव झाला होता.

मात्र, विद्यमान आमदार उदय सामंत यांच्याविरोधात ठाकरे सेनेचा निष्ठावंत शिलेदार उभा करून जागा जिंकायचीच, असा पण ठाकरे गटाने केल्याचे समजते. त्यामुळे राजन साळवी यांना रत्नागिरी मतदारसंघात लक्ष घालायला सांगितल्याची चर्चा आहे. गेली ४ वर्षे रत्नागिरी मतदारसंघात लक्ष न घालणारे साळवी आता सक्रिय झालेत. ठाकरे गटामध्ये त्या निमित्ताने उत्साह दिसत आहे.

आमची देखील राजापूरमध्ये दमदार एन्ट्री

राजन साळवी यांच्या झळकलेल्या बॅनरवरून प्रतिक्रिया देताना, ‘आमची देखील राजापूरमध्ये दमदार एन्ट्री होणार आहे. आज आमदार राजन साळवी यांचा वाढदिवस आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. सर्व इच्छांचा विचार करत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचाही विचार करावा,’ असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मिश्‍कीलपणे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT