खवणे-गाबितवाडीतील रस्त्यामुळे
पावसाळ्यात घरांना धोका
विठोबा सागवेकरः जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३०ः म्हापण कार्यक्षेत्रातील खवणे समुद्रकिनारी जाण्यासाठी खवणे-गाबितवाडी येथे करण्यात आलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात आजूबाजूच्या घरात पाणी घुसणार असून त्यामुळे घरांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत येथील ग्रामस्थ विठोबा सागवेकर यांनी जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
सागवेकर यांना निवेदनात म्हटले आहे की, ''पतन विभागाकडून खवणे-गाबितवाडी येथील वस्तीतील रस्त्याचे काम केले आहे. हा रस्ता समुद्राकडे जाणारा आहे. परंतु, रस्ता करताना येथील सर्व पाणी वस्तीत घुसणार अशा पद्धतीने केला आहे. त्यामुळे अलीकडेच पडलेल्या अवकाळी पावसाचे पाणी येथील वस्तीतील घरांत घुसले होते. आता मान्सून दाखल झाल्यावर याचा जास्त त्रास येथील नागरिकांना होवून वारंवार येथील नागरिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच या पाण्यामुळे येथील घरांना सुद्धा धोका संभवणार आहे.'' याबाबत सागवेकर यांनी म्हापण ग्रामपंचायतीला पत्र दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीने पाहणी करून सागवेकर यांच्या तक्रारीला दुजोरा दिला आहे. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी यावर उपाययोजना ठेकेदाराकडून करून घेण्याची विनंती पतन विभागाला केली आहे. तसेच सागवेकर यांनीही स्वतः पतन विभागाकडे लेखी तक्रार याबाबत केली आहे. यात सागवेकर यांनी पतन विभागाला दोषी धरले आहे. ठेकेदार कोणत्या पद्धतीने काम करीत आहे, याबाबत पतन अधिकाऱ्यांनी जागेवर जावून पाहणी करणे गरजेचे होते. मात्र, तशी कार्यवाही न केल्याने ही स्थिती ओढावली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर सागवेकर यांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधून याबाबत दखल घेण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.