कोकण

डोंगरच गावात कोसळला ; तिवरेत परिसरात 5 किमी डोंगराला भेगा

घरांच्या मधोमध दरड खाली; गावठाणाला वाघजाईने वाचवल्याची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तिवरे गाव सुरक्षित होते. आम्ही येथे मोठ्या हौसेने राहत होतो; मात्र धरणफुटीपासून या गावाला जणू कोणाची दृष्ट लागली आहे. संकटाचा ससेमिरा पाठी लागला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत डोंगरच गावात कोसळले आहेत. तिवरे हायस्कूलपासून धनगरवाड्यापर्यंत पाच किलोमीटरच्या परिसरात जमीन खचली आहे तर दोन फूट खोल भेगा पडल्या आहेत. आम्ही राहतो, त्या परिसरात डोंगराचा काही भाग चिखल, धोंडे, दरडी आणि झाडांना घेऊन खाली आला; मात्र आमच्यावर वाघजाईची कृपा म्हणूनच ७-८ घरांतील आम्ही कुटुंबीय आजचा दिवस पाहायला जगलो आहोत, अशी भावूक प्रतिक्रिया चंद्रकांत व स्वाती शिंदे यांनी दिले.

या परिसरात या आधी अशा दरडी कोसळल्या नव्हत्या. २२ जुलै रोजीची भयावस्था सांगताना शिंदे म्हणाले, आमच्या घराशेजारी साईबाबांचे मंदिर आहे. तेथे सायंकाळी आरती करतो. त्यानंतर अर्धा तास नामस्मरण असते. त्या दिवशी सायंकाळी तिघंच होतो. आरती सुरू असताना मोठ्या वेगाने घराच्या दोन्ही बाजूंनी पाणी घुसले. नितीन नारायण शिंदे हा मुलगा मागच्या बाजूने डोंगर खाली आला, असे ओरडत आला. आमच्या घराभोवती फिरून पाणी व चिखल अंगणात आले. त्याबरोबर आमची घाबरगुंडी उडाली. बाजूने आलेले चिखलमिश्रित पाणी पुढच्या गेटमधून बाहेर पडले. घराला ६ ते ८ फूट उंचीचे चिरेबंदी कंपाउंड आहे. आलेली चिखलमाती त्या कंपाउंडवरून घराच्या मागच्या बाजूत घुसली. त्यामुळे तेथील मोठे झाड उन्मळून पडले. त्यांच्या घराची हानी झाली नाही; मात्र त्यांच्या घरावर असणाऱ्या अन्य घरांना दणका बसला.

एका बाजूला ६ ते ७ घरे, मध्ये साधारण २०० फुटाचे अंतर आणि पलीकडच्या बाजूला आणखी घरे अशा परिस्थितीत डोंगर कोसळल्यानंतर तो ज्या भागातून आला, तेथे दोन वहाळ आहेत. ते दोन्ही वहाळ एक झाले. डोंगरातून पडणाऱ्या चिखलमातीने, दरडींनी मार्ग बदलला आणि या घरांच्या मध्यात ते सारे घुसले. यातून उन्मळून पडलेली झाडे उभी खाली आली. ती आडवी आली असती तर त्यांचा दणका घरांना बसून घरांची मोडतोडही झाली असती; मात्र देवी वाघजाईच्या कृपेने हे टळले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ही सारे शिंदे कुटुंब सुरक्षित तरीही भयाच्या छायेत आहेत. मोठा पाऊस सुरू झाला की छाती धडधडायला लागते. नजर डोंगराकडे लागते, असे शिंदे यांनी सांगितले.

घराभोवती चिखलच चिखल

आरती सुरू असताना दोन्ही बाजूने पाणी आले आणि काय करायचे ते सुचेना. घरात पाणी, चिखल घुसला असता तर खैर नव्हती. घरात वयोवृद्ध आई तिला तिथून हलवणेही कठीण होते. मोठ्या प्रमाणावर चिखल, माती घराच्या अंगणात, भोवती, रस्त्यावरही आली होती. आता सारे देवाच्या हवाल्यावर, असे म्हणून साईबाबांचे नाव घेत रात्र जागून काढली, असे चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT