कोकण

आजरा विवेकानंद संस्थेला ‘बँको २०२२’ पुरस्कार जाहीर

CD

81335
जनार्दन टोपले

आजरा विवेकानंद संस्थेला
‘बँको २०२२’ पुरस्कार जाहीर
बांदा, ता. ८ ः आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेला २०२१-२०२२ चा बँको पतसंस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला. अविज कोल्हापूर येथील एक संस्था व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. १५० ते २०० कोटींच्या ठेवी विभागातून महाराष्ट्र राज्यातून संस्थेची निवड करण्यात आली. महाबळेश्वर (जि. सातारा) येथे १५ मार्चला पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी दिली.
संस्थेच्या आतापर्यंत चढत्या आलेखाप्रमाणे प्रगतीची घोडदौड सुरू असून ३१ जानेवारी २०२३ अखेर संस्थेचे वसूल भाग भांडवल ३ कोटी ५८ लाख रुपयांचे आहे, तर निधी १० कोटी ६७ लाख रुपयांचा आहे. संस्थेकडे १७० कोटी ठेवी, १३० कोटी कर्ज वाटप केले आहे. संस्थेची गुंतवणूक ६० कोटी आहे. सभासद संख्या १५ हजारांवर आहे. संस्थेने ३०० कोटी एकूण व्यवसाय केला आहे. ऑडीट वर्ग सातत्याने ‘अ’ वर्ग आहे. संस्थेच्या सर्व शाखा या संगणकीकृत आहेत. पुरस्कारासाठी संस्थेचे संस्थापक हरी नार्वेकर, मार्गदर्शक महादेव टोपले, उपाध्यक्ष दयानंद भुसारी, संचालक नारायण सावंत, मलिककुमार बुरुड, रवींद्र दामले, रामचंद्र पाटील, महेश नार्वेकर, सुधीर कुंभार, सुरेश कुंभार, संजय घंटे, राजेंद्र चंदनवाले, प्रेमा सुतार, माधवी कारेकर, सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याचे टोपले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT