कोकण

‘व्हॅलेंटाईन डे’ला गस्ती पथके नेमा

CD

81288
सावंतवाडी : पोलिस निरीक्षक फुलचंद भेंगडे यांना निवेदन देताना उमाजी चव्हाण, चंद्रकांत बिले, प्रसाद काळे, राघोबा निब्रे आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

‘व्हॅलेंटाईन डे’ला गस्ती पथके नेमा

हिंदू जनजागृती समिती; सावंतवाडीत पोलिसांना निवेदन

सावंतवाडी, ता. ८ ः ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी तातडीने गस्ती पथके नेमा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली. याबाबतचे निवेदन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, १४ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांची विशेष पथके-गस्ती पथके नियुक्त करून महाविद्यालय परिसरात अपप्रकार करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घ्यावे. वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करावी. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण पाहता शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी मार्गदर्शक सूचना निर्देशित कराव्यात. संकटकाळात सहाय्याच्या दृष्टीने युवतींसाठी ‘हेल्पलाईन’ क्रमांक जाहीर करावा. महाविद्यालयांत ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम, तसेच भारतीय संस्कृतीची महती सांगणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करावे. महाविद्यालयात हा दिवस साजरा करण्यास अनुमती देऊ नये. पाश्चात्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवादी आणि अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. यातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. या दिवशी होणाऱ्या पार्ट्यांमधून युवक-युवतींमध्ये मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत वाढ झाली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी वृत्ती दिवसेंदिवस वाढत असून या प्रकारांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT