कोकण

सायकलिस्टनी केला 1750 किमीचा सायकल प्रवास

CD

rat०८४.txt

बातमी क्र..४ (टुडे पान १ साठी)

फोटो ओळी
-rat८p१२.jpg ः
८१३२२
दापोली ः मुंबईतून सायकलने निघालेले सूरज भुवड आणि सचिन पालक यांनी कन्याकुमारीपर्यंतचा सायकल प्रवास पूर्ण केला.
----
सायकलपट्टूंचा कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास


सूरज भुवड, सचिन पालकर ; मुंबईतून सुरवात ; १४ दिवसात मोहीम पूर्ण

हर्णै, ता. ८ ः स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती बंधुत्व हा संदेश घेऊन दापोली सायकलिंग क्लबचे सायकलिस्ट सूरज भुवड आणि सचिन पालकर यांनी मुंबई ते कन्याकुमारी असा १७५० किमीचा सायकल प्रवास १४ दिवसात पूर्ण केला आहे. त्यांनी २२ जानेवारीला मुंबईहून प्रवास सुरू केला आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील गावातून सायकल प्रवास करत ते ४ फेब्रुवारीला कन्याकुमारी येथे पोहोचले.
दोघांनीही सायकल मोहीमसोबत कोणतीही बॅकअप् गाडी न घेता पूर्ण केली आहे. स्वतःचे साहित्य स्वतःच्या सायकलवर घेऊन दररोज ८० ते १७० किमी अंतर सायकल चालवली. दापोलीत त्यांचे स्वागत केल्यानंतर ते पुढे कन्याकुमारीला रवाना झाले होते. त्यांचा हा प्रवास पूर्ण झाला आहे. याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले, दैनंदिन धावपळीच्या जीवनात ऑफिस नोकरी सुरू असताना स्वतःसाठी थोडा वेळ काढून ही १४ दिवसाची सायकल मोहीम आखली गेली. मार्गावरील नवीन प्रदेश, तिथली संस्कृती, जीवनशैली यांचा अनुभव आस्वाद घेण्यासाठी सायकल प्रवास हा एक चांगला पर्याय आहे. ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांकडून स्वागत पाहुणचार झाला. पर्यावरण रक्षण, सायकलचे महत्व, स्वामी विवेकानंद यांनी जगाला दिलेला बंधुत्वाचा संदेश याबद्दल प्रबोधन चर्चा जनजागृती करत आणि अनेक स्थानिक विषयांवर गप्पागोष्टी करत हा आनंददायी असा न विसरता येणारा सायकल प्रवास झाला. अनेक नवीन माणसे जोडली गेली, नवीन मित्र मिळाले असेही अनुभव कथन करताना त्यांनी सांगितले.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT