कोकण

रत्नागिरी-संक्षिप्त

CD

rat०८१४.txt

(पान २ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat८p३.jpg ः
८१२५०
पावस ः नवलादेवी ते विश्वेश्वर मंदिर या पालखी मार्गावरील रस्त्याची दुरवस्था.
--

पावस नवलादेवी मंदिर मार्गाची दुरवस्था

पावस ः पावस नवलादेवी मंदिरजवळ असलेल्या पालखी मार्गावर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. त्यामुळे उत्सवात पालखी नेताना अडचण येणार नाही. या गावांमध्ये गेल्या अनेक वर्ष ग्रामदेवता नवलादेवीची पालखी उत्सवामध्ये गावामध्ये फिरत असते. ती दरवर्षीच्या ठरलेल्या मार्गाने मार्गक्रमण करत असते. नवलादेवी मंदिराच्या बाजूने विश्वेश्वर मंदिराकडे जाणारा पारंपरिक पालखी मार्ग आहे; परंतु त्या मार्गाची दयनीय अवस्था झाल्यामुळे शिमग्यामध्ये पालखी नेताना गावकऱ्यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी शिमग्याच्या उत्सवाअगोदरच मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे
--
फोटो ओळी
-ratchl८३.jpg-
८१३६६
चिपळूण ः अभिनय स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना सरोज नेने, संजय क्षेमकल्याणी आदी.
----

डीबीजे महाविद्यालयात अभिनय स्पर्धा

चिपळूण, ता. ८ ः एक चित्रपट अथवा सिरियल आपण बघतो त्यावेळी केवळ भूमिका करणाऱ्याचा अभिनय पहात असतो. कथा लेखकापासून पार्श्‍वसंगीत, कॅमेरामन, दिग्दर्शन, वेशभूषा असे अनेक हात त्यांच्या यशामागे कार्यरत असतात.अभिनय क्षेत्रात करियर करायचे असेल तर पूरक बाबींचा अभ्यास असणे महत्त्वाचे आहे, असे विचार अभिनेता दिग्दर्शक संजय क्षेंमकल्याणी यांनी चिपळूण येथील कार्यशाळेत मांडले. सुधाताई करमरकर स्मृतिदिन निमित्त येथील डीबीजे महाविद्यालय सांस्कृतिक विभाग व लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समितीतर्फे नाट्य-चित्र कार्यशाळा व अभिनय स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेते संजय क्षेमकल्याणी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासह ज्येष्ठ कलाकार दत्ता सावंत यांनीही नाट्यशास्त्र हे जगात प्रथम भरत मुनींनी भारतात लिहिलेले शास्त्र २००० वर्षांपूर्वीचे असून विष्णुदास भावे यांनी प्रथम नाट्य सुरू केल्याचे सांगितले. रंगभूमीवर येण्यापूर्वी कोणती माहिती अभ्यासावी याची पूर्ण माहिती दिली. एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक प्रतिभा शिगवण, द्वितीय तेजा कदम, तृतीय अथर्व महाडिक, प्रतीक्षा कदम, संगीता पालकर यांनी यश मिळवले. डीबीजे महाविद्यालयातील पहिल्या बॅचमधील अष्टपैलू असलेल्या सरोज नेने यांनी यावेळी आपल्या स्मृतींना उजाळा दिला. संयोजन रघुनाथ कासेकर, मंगेश डोंगरे, विश्‍वनाथ सपकाळ, संकेत हळदे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT