कोकण

रत्नागिरी ः माजींच्या ढवळाढवळीबाबत मंत्री सामंतांचे कोरडे

CD

फोटो ओळी
- rat9p35.JPG- KOP23L81627
रत्नागिरी ः जिल्हा परिषद स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत जिल्हा परिषद अधिकारी.
--------------
माजींच्या ढवळाढवळीबाबत मंत्री सामंतांचे कोरडे
जिल्हा परिषदेचे प्रशासकीय काम; अधिकाऱ्यांना केले आश्वस्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः जिल्हा परिषदेचे अनेक माजी पदाधिकारी प्रशासकीय कामात ढवळाढवळ करतात; परंतु असे कोणी असतील तर अधिकाऱ्‍यांनीही तुम्ही प्रशासक आहात हे त्यांच्या लक्षात आणून द्या. तुम्ही आता एवढे स्वायत्त आहात, असे सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी माजींच्या कारभारावर ताशेरे ओढले.
प्रशासकीय कामात होत असलेल्या हस्तक्षेपाविषयी मंत्री सामंत यांनी तीव्र नाराजी जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, सदस्य यांच्याविषयी असल्याचे जाणत्यांच्या लक्षात आहे. जिल्हा परिषद स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले, जिल्हा परिषदेत 12 हजार कर्मचारी आहेत. तुम्ही ठरवले तर मतदान बदलू शकता. त्यामुळेच माजी झालेल्या अनेकांचा डोळा जिल्हा परिषदेकडे आहे. ते माजी झाले तरीही त्यांच्याकडून जिल्हा परिषद सुटत नाही. यापेक्षा वेगळे असलेले माजी सभापती बाबू म्हाप, प्रकाश रसाळ यांना मी धन्यवाद देतो. त्यांना स्नेहसंमेलनाच्या आयोजकांनी व्यासपिठावर बोलावले. ते दोघेही माझे सहकारी असले तरीही व्यासपिठावर आले नाहीत. हा खऱ्या अर्थाने राजकीय संस्कार आहे. हा प्रत्येकाने अवलंबला पाहिजे अन्यथा अनेक लोक माजी झाले असले तरीही जिल्हा परिषद प्रशासकीय कामात ढवळाढवळ करत आहेत. ते कोण आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांची नाव घ्यायची गरज नाही; परंतु असे माजी कोणी ढवळाढवळ करत असतील तर अधिकाऱ्यांनीही ‘तुम्ही प्रशासक आहात हे लक्षात घेऊन काम केले पाहिजे. आता स्थायी, शिक्षण समिती घ्यावी लागत नाही. तुम्हाला ब्लॅकमेल करणार नाही. सभा झाल्यानंतर केबिनला बोलावून ना तुम्हाला कोण बोलणार, ना कोण मागणी करणार. आता फक्त तुम्ही लोकासाठी चांगले काम करा.अधिकार्‍यांबाबत ते म्हणाले, विकासकामांसाठी आम्ही अधिकार्‍यांना बोलतो; परंतु आमचा वाद व्यक्तीशी नसतो. आमचा वाद खुर्चीशी आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद अधिकार्‍यांनी विनासंकोच काम केले पाहिजे.


चौकट
रत्नागिरी नगरपालिकेचे कौतुक
रत्नागिरी नगरपालिकेच्या कारभाराचे कौतुक करताना ते म्हणाले, गेल्या पाच ते सहा महिन्यात रत्नागिरी शहर सुंदर आणि स्वच्छ दिसत आहे. काही ठिकाणी कामे करण्यासाठी रस्ते पुन्हा खणले आहेत; पण त्याची डागडुजी केली जाईल. शहरातील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि प्रशासनातील अधिकार्‍यांची वागण्याची पद्धत चांगली असेल तर शहर सुंदर व स्वच्छ होऊ शकते. प्रशासनातील अधिकार्‍यांनी कामे पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न केला तर एखादं शहर आहे त्यापेक्षा सुंदर बनवू शकतो, हे रत्नागिरीतील नगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी करून दाखवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT