कोकण

फणस पोळी आणि चिप्स

CD

90657
डॉ. विलास सावंत

फणस पोळी आणि चिप्स
अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये फणसाच्या फळाला मोठे महत्त्व आहे. फणसाचे विविध पदार्थ बनवून चांगली कमाई होऊ शकते. फणसाच्या गऱ्यांपासून चिप्स (तळलेले गरे), फणस पोळी, पल्प व आठळ्यापासून पावडर बनविता येते. कच्च्या गऱ्यांपासून चविष्ट भाजी बनविता येते. फणस हे औषधी गुणांनी भरलेले फळ आहे. फणसामध्ये विटामिन-ए, विटामिन-सी, थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम रायबोप्लेविन, आयरन, नियासिन आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत असून त्यामुळे अतिशय गुणकारी आहे.
- डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस
................
सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व फळांमध्ये फणस हे फळ आकाराने सर्वांत मोठे असते. भारत आणि दक्षिण आशिया हे फणसाचे मूळ स्थान आहे. कोकण, गोवा व बंगळूर या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आढळतात. फणस हे ‘मोरॅसी’ कुळातील आहे. कापा व बरका अशा त्याच्या मूळ दोन जाती आहेत. कापा प्रकारात मधुर, चविष्ट व कडक गरे आढळतात. हे गरे पिवळ्या रंगाचे असतात. बरका फणसामध्ये गरे गोड व लिबलिबीत नरम आढळतात. फणसाचे गरे व आटळे या दोन्हीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण ‘प्रॉलीफिक’ ही जात विकसित केली आहे. या जातीच्या फणसाची फळे मध्यम असून पावसाळ्यातही गर चांगला राहतो. पिकलेला फणस शीतल, स्निग्ध, तृप्तीदायक, मधुर, गुणात्मक, मांसवर्धक व बलदायक असतो. फणसाचा उपयोग शरीर संवर्धनासाठी व पचनशक्ती वाढविण्यासाठी होतो. फणसाचे गरे लहान मुलांनी खाल्याने त्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होते. फणसाच्या झाडाला उन्हाळ्यामध्ये फळे येतात. कापा फणसाला प्राधान्यक्रम दिला जातो.
फणस पोळी बनविण्यासाठी चांगल्या पिकलेल्या बरक्या फणसाच्या गऱ्यांपासून रस तयार करावा. त्यासाठी गरे काढून आतील बिया काढून वेगळ्या कराव्यात. नंतर गरे घोटून रस तयार करावा. तयार केलेला रस स्टीलच्या चाळणीतून गाळून घ्यावा. गाळलेला रस स्टीलच्या किंवा अल्युमिनीयमच्या ताटात पातळ ओतावा. रस ताटात चिकटू नये, म्हणून ताटाला तुपाचा हात लावावा. नंतर सल्फर वायूची धुरी द्यावी. त्यामुळे रस काळपट होणार नाही. रसाचे ताट कडक उन्हामध्ये वाळत ठेवावे. रसाचा एक थर वाळल्यावर त्यावर दुसरा थर द्यावा. अशा प्रकारे थरावर थर देऊन साधारपणे ०.६ ते १.२५ सेंटीमीटर जाडी झाल्यावर त्याचे तुकडे करून बटरपेपरमध्ये गुंडाळून घट्ट झाकणाच्या बरणीत साठवावेत. फणसाचे चिप्स म्हणजेच फणसाचे तळलेले गरे घरच्या घरी सहज बनविता येतात. प्रथम कच्चा फणस फोडून त्यातील गरे काढावेत. त्यानंतर गऱ्यांतील बिया काढाव्यात. विळीच्या किंवा चाकूच्या साहाय्याने गऱ्यांचे चिप्स तयार करावेत. हे चिप्स खोबरेल तेलात खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यावेत. तळलेल्या गऱ्यावर चवीनुसार मिठाचे द्रावण शिंपडावे. त्यानंतर गरे थंड झाल्यावर प्लॅस्टिक पिशवीमध्ये वजन करून भरावेत व साठवणूक करावे. तळलेले गरे खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT