कोकण

कोरोनात गेली नोकरी, कलिंगड शेतीने दिला आधार

CD

-rat६p१२.jpg-
९३९५१
डिंगणी ः उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कलिंगडे गवतात झाकून ठेवताना मनोज काजरेकर.
-
कलिंगडच्या शेतीने दिला आधार...

संगमेश्वर-डिंगणीतील काजरेकरांचा यशस्वी प्रयोग ; कोरोनात नोकरी गेल्याने शोधली नवी संधी

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ६ ः गेली दोन वर्ष व्यवसाय करताना हवा तसा फायदा होत नसल्याने न डगमगता तिसऱ्या वर्षी कलिंगडाची लागवड करून संगमेश्वर-डिंगणी येथील तरुण शेतकरी मनोज काजरेकर यांनी चांगले उत्पादन घेतले. दोन एकरमध्ये ३० टन कलिंगड उत्पादन झाल्याने पुढील वर्षी चांगली बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे मनोज काजरेकरने सांगितले.
कोरोना काळात मुंबईमध्ये नोकरीला मुकावे लागल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी गावाकडील जमिनीमध्ये काहीतरी उत्पादन करावे व उदरनिर्वाह करावा या हेतूने कलिंगड लागवड केली. सुरवातीची दोन वर्षे लागवडीतून फारसे काही हाती लागले नाही. तरीही जिद्दीने यावर्षी पुन्हा कोल्हापूर येथील रोपे आणून सुमारे दोन एकरवर लागवड केली. डिसेंबर महिन्यामध्ये केलेल्या लागवडीला फेब्रुवारीमध्ये उत्पादन सुरू झाले. रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, देवरूख आदी ठिकाणी स्थानिक पातळीवर बाजारपेठ मिळाल्यामुळे उत्पादित कलिंगडाला चांगला भाव मिळाल्यामुळे उत्पन्न चांगले मिळाले. गेली दोन वर्ष झालेला तोटा यावर्षी भरून निघाला. ३० टन उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळाली. यावर्षी मुंबईत बाजारपेठ शोधण्याचा विचार होता, परंतु दळणवळणाच्या दृष्टीने परवडणारे नसल्यामुळे मुंबई बाजारपेठ गाठू शकलो नाही, असे काजरेकरने सांगितले.
-
रोपांवर रोगांमुळे नुकसान
यावर्षी १२ हजार रोपांची लागवड केली होती. त्यातील सुमारे सहा हजार रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्याच्यातून काही उत्पन्न मिळू शकले नाही. मात्र उर्वरित रोपांची व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे चांगले उत्पन्न मिळाले व त्याची चांगल्या दराने विक्री करण्यात आली. त्यामुळे पुढील वर्षी लागवड करताना रोपांवर पडणारा रोग, स्थानिक बाजारपेठेव्यतिरिक्त बाहेरील बाजारपेठ आदी गोष्टींचा विचार करून पावले उचणार असल्याचे मनोज काजरेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: "ज्याची बिश्नोई समाज पूजा करतो, त्याला तुम्ही शिजवून खाल्ले," 'प्रिय सलमान' म्हणत कुणी केली माफी मागण्याची विनंती?

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशानसुद्धा टार्गेटवर; मुंबई पोलिसांकडे महत्त्वाचे इनपुट्स

Latest Maharashtra News Updates : कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा! जागा वाटपाबाबत भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक

Baba Siddique Murder: धर्मराज काश्यप अल्पवयीन नाहीच; डाव फसला, 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी

Morning Breakfast: पौष्टिक नाश्त्याने करा दिवसाची सुरूवात, बनवा स्वादिष्ट मिसळीचे थालीपीठ, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT