कोकण

कर्नाटकातील गाबित समाज महोत्सवात सहभागी होणार

CD

kan१०१.jpg
९४७८३
कारवारः येथील गाबीत सामाजबांधवाची परशुराम उपरकर, अॅड.काशिनाथ तारी,चंद्रशेखर उपरकर यांनी भेट घेतली
-----------
कर्नाटकातील गाबित समाज
महोत्सवात सहभागी होणार
कणकवली, ता. १०ः कर्नाटक राज्यातील कारवार येथील उत्तर कन्नड जिल्हा हिंदू.गाबीत समाज संस्थेस (नंदनगड्डा,कारवार) भेट देऊन सिंधुदुर्ग मालवण येथील दांडी किनारी होणाऱ्या ‘गाबीत महोत्सवाची’ माहिती देऊन या महोत्सवात ते सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय गाबीत समाज अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर, उपाध्यक्ष अॅड. काशिनाथ तारी, गाबीत समाज सिंधुदुर्ग अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी कर्नाटक राज्यातील कारवार येथील गाबीत समाज संस्थेस भेट देऊन निमंत्रण दिले आहे.
मालवण येथील दांडी किनारी होणाऱ्या ‘गाबीत महोत्सवाची’माहिती देऊन सर्व गाबीत बांधवांना २७ ते ३० एप्रिल रोजी उपस्थित रहाण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. यावेळी उत्तर कन्नड जिल्हा हिंदू गाबीत समाज संस्थेचे अध्यक्ष राम जोशी, कार्यदर्शी आनंद जामसदडेकर, उपाध्यक्ष विनोद सागेकर, प्रेमानंद सावंत, विनायक सागेकर, गणपति टिकम, सुनिल कुमठेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. नंदनगड्डा,कारवार येथे संस्थेचे सिद्धिविनायक गणपती मंदिर असून बाजूला लग्नाचा हॉल उपलब्ध आहे. बहुसंख्य गाबित बंधूंची मूळ कुलदैवते ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण,देवगड,वेंगुर्ला येथील किनारपट्टी गावातील आहेत. सुमारे १८५ किलोमिटर समुद्री किनारपट्टी असून जास्तीत जास्त जागा ही केंद्र शासनाच्या संरक्षित वन क्षेत्रात असल्याने विकास करताना स्थानिक ग्रामस्थांना अडचणी येतात. कारवार शिवाय गोवा हद्दीला लागून बेतुल,काणकोण,कुमठा वगैरे भागात गाबीत वस्ती असून ती सुमारे २५ हजार पर्यंत असावी असा अंदाज आहे. भविष्यात या सर्वाना आणि गोवा राज्यातील गाबीत बांधवांना अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचा मनोदय अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार उपरकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT