कोकण

बियाणे, रोपे, कलमे खरेदासीठी अनुदान

CD

माहितीचा कोपरा

swt108.jpg
94822
विनोद दळवी

बियाणे, रोपे, कलमे
खरेदासीठी अनुदान

लीड
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुधारलेल्या बियाण्यांच्या वापरात वाढ होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने सुधारलेल्या बियाणे, रोपे, कलमे खरेदीसाठी 75 टक्के अनुदानावर योजना राबविली जात आहे. यातून जिल्ह्यातील भाजी पिके वाढावी हा जिल्हा परिषदेचा मानस आहे.
- विनोद दळवी
...................
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ग्रामीण भागातील नागरिकांना सर्वंकष विकास होण्यासाठी सतत धडपड करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. यासाठी जिल्हा परिषद विविध नावीन्यपूर्ण योजना स्वनिधी अथवा जिल्हा वार्षिक योजना निधीतून राबवित असते. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेने स्वनिधीतून सुधारीत बियाणे, रोपे, कलमे कमीत कमी किंमतीत शेतकऱ्यांना मिळावीत, यासाठी ही योजना सुरू केली आहे. यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली जाते. त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत असून अधिकाधिक उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.
जिल्हा परिषद वाढीव उपकरातील योजना अंतर्गत सुधारलेल्या बियाणे, रोपे कलमे खरेदी व वाहतुकीसाठी योजना तयार करून 75 टक्के अनुदानावर भाजीपाला बियाण्याची मिनीकिट पुरविली जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांना कमी किंमतीत बियाणे उपलब्ध होत आहे. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या महाबीज यांचे मिरची, दोडका, चवळी, गवार, पालक, भेंडी, संकरित दुधी भोपळा, मेथी इत्यादी बियाण्यांचे मिनीकिट वितरित केली जातात.
..................
अर्ज कुठे करावा?
सुधारलेल्या बियाणे, रोपे, कलमे खरेदीसाठी 75 टक्के अनुदानावर योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समितीजवळ जाऊन रीतसर मागणी करणारा अर्ज करायचा आहे. यासाठी पंचायत समितीत छापील अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक शेतकऱ्याचा अर्ज पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेत प्राप्त होणे क्रमप्राप्त आहे.
................
यामुळे ही अट शिथिल
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्याचे शिफारस पत्र बंधनकारक असते; मात्र सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक राजवट आहे. त्यामुळे यावर्षी ही अट शिथिल झालेली आहे. शेतकरी थेट या लाभासाठी पंचायत समितीकड़े अर्ज करू शकतो.
...............
हे कागदपत्र आवश्यक
योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सातबारा आणि आठ ''अ'' जोडणे गरजेचे आहे. लाभार्थ्यांच्या नावाचे बँक पासबुक असल्याची झेरॉक्स जोडावी लागते. 75 टक्के अनुदान या खात्यावर जमा केले जाते.
.................
लाखो रुपयांची तरतूद
2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेने सुधारलेल्या बियाणे, रोपे, कलमे खरेदीसाठी 75 टक्के अनुदान या योजनेसाठी 3 लाख 49 हजार 950 रुपये एवढा निधी खर्च केला आहे. यात एक लाख 16 हजार 650 एवढा लाभार्थी हिस्सा राहिल्याने योजनेवर एकूण 4 लाख 66 हजार 600 रुपये एवढा खर्च झाला आहे.
...............
कोट
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला यांच्या उन्नतीसाठी झटणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याच धर्तीवर जिल्हा परिषद स्वनिधीतून सुधारलेल्या बियाणे, रोपे, कलमे खरेदीसाठी 75 टक्के अनुदान ही योजना राबविण्यात येत आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी घ्यावा.
- विरेश अंधारी, जिल्हा कृषी अधिकारी
.................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT