कोकण

वाफोली नळपाणी योजनेबाबतचे आजचे बेमुदत उपोषण स्थगित

CD

swt1028.jpg
94936
संजय आईर

वाफोली नळपाणी योजनेबाबतचे
आजचे बेमुदत उपोषण स्थगित
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १०ः वाफोली येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या पूरक नळपाणी योजनेसंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार संजय आईर व विद्यमान तीन ग्रामपंचायत सदस्यांनी पुकारलेले उपोषण मागे घेतले.
विश्वासात न घेता केवळ चार लोकांना घेऊन योजनेच्या कामाचे भूमिपूजन केल्याने मासिक सभेत सदस्यांनी जाब विचारला, तेव्हा खडाजंगी होऊन वाद निर्माण झाला होता. सामाजिक कार्यकर्ते आईर यांनी योजनेसाठी हस्तांतर केलेल्या जागेचा सर्व्हे करून गाव दप्तरी रेकॉर्डला सातबारा सदरी नोंद करवून घेण्याबाबत ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केला होता. तशी मासिक व ग्रामसभेत चर्चा करून ठराव करून घेण्यात आलेला होता; परंतु ग्रामपंचायतीने काहीच कारवाई न करता, जागेचा सर्व्हे न करता व सर्व्हेबाबत काही अडचणी होत्या तर ग्रामपंचायत सदस्य व अर्जदार यांना विश्वासात घेऊन यांच्याबरोबर चर्चा करूनच त्यानंतर योजनेचे काम सुरू करावे, अशी विरोधी सदस्यांची मागणी होती.
यावरून वाद निर्माण झाल्याने आईर यांच्यासह तीन ग्रामपंचायत सदस्यांनी आज बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुषंगाने सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आईर, वाफोली तंटामुक्ती अध्यक्ष, वाफोली पोलिस पाटील यांची संयुक्त बैठक ग्रामपंचायत येथे घेण्यात आली. योजनेच्या वादग्रस्त वेगवेगळ्या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. सर्वांना विश्वासात घेऊन योजना मार्गी लावण्यावर एकमत झाले. यापुढे सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून पुढे पाऊल टाकू, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT