कोकण

देवगडात 17 ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

CD

देवगडात १७ ग्रामपंचायतींचा
पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीसाठीचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये विजयदुर्ग आणि ठाकूरवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या जागांसह एकूण १९ सदस्य जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी आवश्यक वाटल्यास १८ मे रोजी मतदान तर १९ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
तालुक्यातील कुवळे, हडपीड, मणचे, पडेल, आरे, ठाकूरवाडी, गवाणे, गोवळ, कोटकामते, मुटाट, कातवण, सांडवे, कुणकवण, ओंबळ, पेंढरी, विजयदुर्ग आणि मळेगाव अशा एकूण १७ ग्रामपंचायतीसाठीचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यातील विजयदुर्ग आणि ठाकूरवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या जागासाठीही निवडणूक होणार आहे. ठाकूरवाडीमध्ये सरपंच आणि एक सदस्य जागा रिक्त आहे. तसेच ओंबळ आणि गोवळ या दोन ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी दोन जागा तसेच आणि उर्वरित ठिकाणी एक जागा रिक्त असल्याने एकूण १७ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या १९ सदस्य जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी २५ एप्रिलपासून २ मे पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करावयाची आहेत. ३ मे रोजी सकाळी ११ वाजता आलेल्या अर्जांची छाननी होईल. ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. याचदिवशी दुपारी ३ नंतर उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. आवश्यक असल्यास १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल. १९ मे रोजी सकाळी मतमोजणी होईल. येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT