कोकण

दाभोळ-185 वीज ग्राहकांची वीज तोडली

CD

दापोलीत १८५ ग्राहकांची वीज तोडली

ंमहाविरणची कारवाई; थकीत बिलामुळे कारवाई
दाभोळ, ता. ११ ः दापोली तालुक्यात महावितरणकडून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांकडून मार्चअखेरच्या निमित्ताने धडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांच्या थकित वीजबिलाची वसुली करण्यात आली आहे. या वसुली मोहिमेत विद्युत बिल थकवणाऱ्या १८५ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

मार्चअखेरच्या निमित्ताने महावितरणने चालू व थकित अशी एकत्रित वीजबिलाच्या वसुलीला सुरवात केली. यात महावितरणने अधिकाधिक वसुली केल्याचे समोर आले आहे. यात घरगुती, व्यापारी, औद्योगिकमध्ये ६ कोटी १८ लाख, कृषी शेतीपंप, रस्त्यावरील दिवाबत्ती ५ कोटी ८५ लाख वसूल करण्यात आले आहेत; मात्र ३ लाख ७५ हजार रुपयांची वीजबिले थकित असलेल्या १८५ ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची नोटीस महावितरण देत नाही. अचानक वीजपुरवठा खंडित करण्याकरिता येतात. त्यामुळे ग्राहकांची धावधाव होते. नियमानुसार कारवाई होत नसल्याने महावितरणच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. महावितरणने वीजबिल थकित असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी नोटीस देणे बंधनकारक असल्याने त्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ! शहराध्यक्ष भगवान भालेराव यांची रिपब्लिकन आठवले पक्षातून हकालपट्टी

IND vs BAN: धावा नाही केल्या तरी काय झालं? Virat Kohli च्या नागीन डान्सवर चाहते खूश, पाहा व्हिडिओ

Bigg Boss Marathi 5: दोनच आठवड्यात Sangram Chougule यांनी घेतला बिग बॉसचा निरोप, कॅप्टन्सी टास्क पडला महागात

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

SCROLL FOR NEXT