सुकामेवा, मिठाईसाठी मुंबईवर भिस्त
रमजान विशेष ; फिरत्या स्टॉलवर विक्रीला प्राधान्य
चिपळूण, ता. १० : रमजान महिन्यातील कडक उपवास करीत असताना शरीराला ऊर्जा आवश्यक असते. ही ऊर्जा देणारी काजू, बदाम, चारोळी, पिस्तासह अनेक मेवा-मिठाई चिपळूण मध्ये मुंबईतून आणली जाते.
चिपळूणची बाजारपेठ मुंबईकरांसाठी जवळची असल्यामुळे अनेक घाऊक आणि किरकोळ विक्रेते मुंबईतून सुकामेवा आणि इतर मिठाई आणतात. यावर्षी चारोळी, पिस्ता, अक्रोड वगळता इतर वस्तूंचे दर नियंत्रणात आहेत. कोकणातील काजू विक्रीसाठी मुंबई जात असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
रमाजान महिन्यातील उपवास हे थंड, पाणीदार फळांनी सोडतात. याबरोबरच मेवा-मिठाईचीही गरज भासते. चिपळूण शहरात या वस्तूंचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागले आहेत. शहर आणि तालुक्यात काही स्टॉल वरून सुकामेवा पुरवठा केला जात आहे. यंदाही काही वस्तू वगळता पुरवठा असून, त्यांचे दरही स्थिर आहेत. रमजानच्या महिन्यात खजूरची मोठ्या प्रमाणावर विक्री होते खजूर सह सुकामेवा हा मुंबईच्या बाजारपेठेतून चिपळूणमध्ये येतो. चिपळूण मधील व्यापाऱ्यांना मुंबईची बाजारपेठ जवळ असल्याने ते वाशी आणि मुंबईच्या बाजारपेठेतून रमजान साठी लागणारे साहित्य आणतात. बाजारपेठेत काजू, बदाम, चारोळी, पिस्ता, अक्रोड, बेदाणे या वस्तू १०० ग्राम पासून एक किलो पर्यंतच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध आहेत.
शहरातील कावीळतळी येथे सैफ हमदुले यांनी सुकामेवा विक्रीचे स्टॉल लावले आहे. ते म्हणाले मागील पंधरा दिवसात ७०० किलो खजूरची विक्री झाली. काजू, बदाम, पिस्ताला मागणी अजून थंड आहे. ईद जवळील तशी सुकामेवाला मागणी वाढेल. रमजान चा रोजा सोडण्यासाठी खजूर आवश्यक असते त्यामुळे सध्या खजूरची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात नागरिकांना बाजारात जाऊन खरेदी करता येत नाही त्यामुळे आम्ही टेम्पोतून मुस्लिम मोहल्यात देजाऊन गावोगावी सुकामेव्याची विक्री करत आहोत
-----------
चौकट
असे आहेत दर...
काजू : २१० रु. पावकिलो
बदाम : २४० रु. पावकिलो
चारोळी : ४०० रु. पावकिलो
पिस्ता : ६०० रु. पावकिलो
अक्रोड : ३५० रु. पावकिलो
खजूर : ११० रु. पावकिलो
दूध शेवया : २२० रु. किलो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.