कोकण

सर्व कृषी सेवा केंद्राच्या तपासणीच्या सूचना

CD

६ (पान ६ साठी)

-rat२२p६.jpg ः
९७७५३
रत्नागिगरी ः खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठकीला उपस्थित बियाणे विक्रेते, उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी.
-
कृषी सेवा केंद्राच्या तपासणीच्या सूचना

सुनंद कुऱ्हाडे ; विनापरवाना बियाणे, खते विक्रीवर लक्ष

पावस, ता. २२ ः शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या निविष्ठांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी जिल्ह्यातील निरीक्षकांना सर्व कृषी सेवाकेंद्रांची तपासणी करणे तसेच आलेल्या निविष्ठांचे नमुने घेण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेते, उत्पादक कंपनी यांची खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठक रत्नागिरीत घेण्यात आली. बैठकीत ज्या ठिकाणी खते व बियाणे यांची विनापरवाना विक्री केली जाते, अशा ठिकाणी तत्काळ संबंधित तालुक्याच्या तक्रार निवारण समिती किंवा भरारी पथकाला माहिती देण्याबाबत आवाहन करण्यात आले.
गतवर्षी ज्या कृषी सेवाकेंद्रांनी कायद्यातील नियमांचे उल्लंघन केले होते अशा पाच कृषी सेवाकेंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. बियाणे, खते व कीटकनाशके यांचे जिल्ह्यातून विविध विक्री केंद्रामधून घेतलेल्या नमुन्यांपैकी ज्यांचे नमुने अप्रमाणित आले आहेत अशा विक्री व उत्पादन करणाऱ्या कंपन्याविरुद्ध तीन कोर्ट केस दाखल केल्याची माहिती कुऱ्हाडे यांनी दिली. त्यामुळे सर्व परवानाधारकांनी निविष्ठा विक्रीसंदर्भात कायद्यातील नियमांचे पालन करण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या निविष्ठा वेळेत पुरवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
----

खत पुरवठ्याबाबत नियोजन

खरीप हंगामासाठी लागणारे भात व नाचणी बियाणे पुरवठ्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. तसेच भातपिकासाठी लागणाऱ्या खतांमध्ये महत्वाचे असणारे युरिया खताच्या पुरवठ्याबाबत आरसीएफ कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत नियोजन करण्यात येऊन मे महिनाअखेर सर्व खताचा पुरवठा करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT