कोकण

शेतकऱ्यांना में महिन्याअखेरपर्यंत मिळणार खते

CD

१७ (पान ५ साठी)


- rat२२p१६.jpg-
९७७६३
रत्नागिरी ः बाबा दळी यांचे स्वागत करताना जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे.
---
शेतकऱ्यांना खते मे अखेरपर्यंत

वितरक कंपनीना सूचना ; दर्जा तपासणार

रत्नागिरी, ता. २१ ः में महिन्याअखेरपर्यंत सर्व खताचा पुरवठा करा, अशा सूचना खत वितरक कंपनीना जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे गेली दोन वर्षे वाहतुकीमधील अडथळ्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध झालेले नव्हते. ती परिस्थिती यंदा उद्भवणार नाही, अशी तजवीज बैठकीत करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेते तसेच उत्पादक कंपनी यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी सुनंदा कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. खरीप हंगामासाठी लागणारे भात व नाचणी बियाणे पुरवठाबाबत चर्चा झाली. तसेच भात पिकासाठी लागणाऱ्‍या खतांमध्ये महत्त्वाचे असणारे युरिया खताच्या पुरवठ्याबाबत आरसीएफ कंपनीच्या प्रतिनिधी समवेत नियोजन करण्यात आहे. मे महिन्याअखेर सर्व खताचा पुरवठा करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या सभेसाठी कृषी विकास अधिकारी अजय शेंडे, भात संशोधन केंद्र प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी, कृषी अधिकारी श्री पोकळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सागर साळुंखे, जिल्हा अध्यक्ष माफदा बाबा दळी, तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक, खत उत्पादक कंपनी आरसीएफ, इफको व एमएआयडीसी यांचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सर्व खते, बियाणे विक्रेते उपस्थित होते.
----
पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

कृषी सेवा केंद्रांनी कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्‍या पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बियाणे, खते व कीटकनाशके यांचे जिल्ह्यातून विविध विक्री केंद्रामधून घेतलेल्या नमुन्यांपैकी अप्रमाणित नमुने असलेल्या विक्री व उत्पादन करणाऱ्‍या कंपन्याविरुद्ध तीन कोर्ट केसेसही दाखल आहेत, अशी माहिती श्रीमती कुऱ्हाडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT