कोकण

संक्षिप्त

CD

मल्लखांब प्रशिक्षण केंद्राचा
दापोलीत आज होणार आरंभ
दाभोळ ः दापोली तालुका मल्लखांब असोसिएशनच्या मल्लखांब प्रशिक्षण केंद्राचा आरंभ रविवारी (ता. २३) एप्रिलला आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २३ ला सायंकाळी ६ वाजता दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेज येथे होणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पवार, कार्याध्यक्ष मंगेश राणे व पदाधिकारी यांनी केले आहे.
-------

-rat२२p२६.jpg ः
97822
देवरूख ः दिव्यांग मुले साहस शाळेच्या विस्तारणी कामाचे भूमिपूजन करताना सदानंद भागवत, सुजाता भागवत.

देवरुखात ''साहस''च्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन
साडवली ः देवरूख येथील नेक्स्ट जनरेशन फाउंडेशन या संस्थेच्या गतिमंद मुलांसाठीच्या ''साहस'' प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत व सुजाता भागवत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रकल्पाच्या संचालिका अॅड. पुनम चव्हाण, संचालक सुहास जाधव, शिरीष फाटक, मोरे तसेच दिव्यांग मुलांचे पालक आणि सर्व विद्यार्थी हजर होते. ''साहस'' प्रकल्पांतर्गत गतिमंद दिव्यांग मुलांसाठी शाळा, व्यवसाय शिक्षण शाळा चालवली जात आहे. सध्या येथे १५ मुले शिक्षण घेत आहेत. या प्रकल्पासाठी राजवाडे बंधूंनी मोफत जमीन दिली असून, पहिल्या टप्प्यासाठी ३० लाख रुपये खर्च आला. पुढील टप्प्यामध्ये या मुलांसाठी कायमस्वरूपाची निवासव्यवस्था उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे. यासाठीही ३० लाखाचा निधी उभारण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. निवासवर्ग झाल्यास तालुक्यातील दुर्गम भागातील दिव्यांग मुलांना या शाळेचा लाभ घेता येईल, अशी माहिती अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली. या प्रकल्पाकरिता समाजातील दातृत्वशील नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन केले.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT