कोकण

समानता हाच खरा मानव धर्म

CD

97866
मालवण ः ‘साहित्य आणि संस्कृती चर्चा चिंतन’ विषयावर रमजान दर्गा यांनी विचार मांडले.

समानता हाच खरा मानव धर्म

रमजान दर्गा; मालवणात ‘साहित्य आणि संस्कृती चर्चा, चिंतन’

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ : गांधीवाद, आंबेडकरवाद, लोहियावाद याचबरोबरीने अनेक विचारप्रवाह आहेत. हे विचारप्रवाह जरी वेगळे असले तरी ते मानवतावादाची शिकवण देतात. आपण कोणत्या धर्माचे आहोत हे महत्त्वाचे नसून प्रेम, समानता हाच आपला धर्म आहे. याच धर्माने आपल्याला माणसांना जोडायचे अहे. आप्पा, अण्णा, अक्का, ताई हे द्रविडी शब्द आहेत. हे शब्द कन्नडमध्ये देखील आहेत. आपल्याला मराठी आणि कन्नड या संस्कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद करायचा नाही. दोन्ही संस्कृती कशा वाढतील, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन धारवाड येथील विचारवंत रमजान दर्गा यांनी आज येथे केले.
जनवादी साहित्य संस्कृती चळवळ आणि येथील बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने आयोजित ‘साहित्य आणि संस्कृती ः चर्चा चिंतन’ या कार्यक्रमाचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी जनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष संध्या नरे-पवार, बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅङ. देवदत्त परुळेकर, संपत देसाई आदी उपस्थित होते.
श्री. दर्गा म्हणाले, ‘‘मनुस्मृती हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर तो सांस्कृतिक तंत्रज्ञान आहे. त्या आधारे केवळ १० टक्के वर्गाने ९० टक्के वर्गाला धार्मिक, सामाजिक, आर्थिक, मनोवैज्ञानिकदृष्ट्या नियंत्रित ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे बहुजन वर्गाने मनुस्मृती वाचणे गरजेचे आहे.’’ श्रीमती नरे-पवार म्हणाल्या, ‘‘सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कातळशिल्पे सापडली आहेत. ही कातळशिल्पे साधारणत: ३० हजार वर्षांपूर्वीची आहेत. यामधून ३० हजार वर्षांपूर्वी विकसित अशी मानवी वस्ती होती, हे सिद्ध होते. आपण आजपर्यंत इ. स. पूर्व १००० ते १५०० वर्षांपर्यंतचा इतिहास पाहत होतो; परंतु कातळशिल्पांमधून ३० हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा उलगडा होणार आहे. आर्य येण्यापूर्वीच्या मानवी संस्कृतीचा इतिहासाचा उलगडा होणार आहे. विकसित असलेली मानवी संस्कृती कोणत्या कारणामुळे नष्ट झाली, याचेही उत्तर संशोधनातून मिळणार आहे.’’ यावेळी श्री. देसाई यांनी ‘जनवादी साहित्य चळवळ आणि साहित्य संस्कृती चर्चा चिंतन’, या उपक्रमाविषयीची भूमिका स्पष्ट केली. अॅड. परुळेकर यांनी सेवांगणच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. महेश पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT