कोकण

देवगडची समीक्षा ‘सागर सुंदरी’

CD

99327
मालवण ः ‘सागर सुंदरी’ स्पर्धेत देवगडच्या समीक्षा कुबल हिने बाजी मारली. परशुराम उपरकर यांच्या हस्ते तिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. (छायाचित्र ः गणेश गावकर)

देवगडची समीक्षा ‘सागर सुंदरी’

मालवणातील स्पर्धा; गाबीत महोत्सवानिमित्त उपक्रम

मालवण, ता. २९ : दांडी किनाऱ्यावर आयोजित गाबीत महोत्सवात शुक्रवारी रात्री झालेल्या सागर सुंदरी स्पर्धेत देवगड-आनंदवाडी येथील समीक्षा (गौरी) कुबल हिने बाजी मारत ‘सागर सुंदरी’ किताब पटकावला. मुंबई येथील डॉ. निशा धुरी यांनी द्वितीय, मालवण धुरीवाडा येथील लतिका शिर्सेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
शहरातील दांडी समुद्रकिनारी गाबीत महोत्सव साजरा होत असून या महोत्सवात काल रात्री ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत गाबीत समाजातील १४ तरुणींनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, पश्चिमात्य वेशभूषा व कला सादरीकरण, मनपसंत फेरी अशा तीन प्रश्नमंजुषा तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या सर्व फेऱ्यांमध्ये वरचढ ठरत देवगडच्या समीधा ऊर्फ गौरी कुबल हिने ‘सागर सुंदरी’चा किताब पटकाविला. डॉ. धुरी हिने द्वितीय व शिर्सेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या समीधाला मानाचा मुकुट व रोख दहा हजार रुपये, द्वितीय व तृतीय क्रमांकास क्राऊन व रोख रक्कम देऊन अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. बेस्ट स्माईल- सोनिया कोचरेकर (वेंगुर्ले), बेस्ट पर्सनॅलिटी-दीपशिखा रेवंडकर (दांडी मालवण), बेस्ट फोटोजेनिक फेस-हर्षदा कांदळगावकर (देवगड), बेस्ट कॉश्युम-प्राची जोशी (मालवण) यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेची पारितोषिके अन्वेषा आचरेकर, सेजल परब, दीपिका घारे, नारायण धुरी, वैभव खोबरेकर यांनी पुरस्कृत केली होती. परीक्षण लक्ष्मीकांत खोबरेकर व मनस्वी कुबल यांनी केले. स्पर्धेसाठी चेतन हडकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जिल्हा सचिव रविकिरण तोरसकर, महेंद्र पराडकर, पूजा सरकारे, सेजल परब, अन्वय प्रभू, अन्वेषा आचरेकर, मेघा गावकर, संमेष परब, रुपेश खोबरेकर, नारायण धुरी, वैभव खोबरेकर, रुपेश खोबरेकर, सुरवी लोणे, माधुरी प्रभू आदी उपस्थित होते. दिनेश कोयंडे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT