कोकण

राजापूर ः बारसूचा सडा पाचव्या दिवशी शांत

CD

-rat२९p११.jpg
99373
राजापूर ः रानतळे येथे उभारलेल्या पोलिस चेकपोस्टवर अशाप्रकारे बॅरिकेड ठेवून रस्ता बंद केला आहे.

बारसूचा सडा पाचव्या दिवशी शांत

पोलिसांचा ताफा तैनात; आंदोलनस्थळी शुकशुकाट

राजापूर, ता. २९ ः बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीविरोधातील आंदोलन शुक्रवारी (ता. २८) चिघळले, अन्‌ पाठोपाठ तीन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर केला. त्यामुळे सर्वेक्षण स्थळाकडे आज आंदोलक फिरकले नाहीत. यामुळे मागील चार दिवसांपासून आंदोलकांच्या उपस्थितीने गजबलेला बारसू सडा आज शांत होता. पोलिस फौजफाटा मात्र तैनात होता.
तालुक्यातील बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरीसाठी माती परीक्षणाचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याला ग्रामस्थांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून ग्रामस्थ माती परीक्षणाचे काम होत असलेल्या परिसरामध्ये ठिय्या मांडून बसलेले होते. माती परीक्षणाच्या सर्वेक्षणाच्या सुरवातीला काही आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी काही आंदोलक महिलांना अटकही केली होती. त्यानंतर, माती परीक्षणाचे आणि ग्रामस्थांचे आंदोलनही शांततेमध्ये सुरू होते. जिल्हा प्रशासनाने रिफायनरीच्या अनुषंगाने ग्रामस्थांशी विशेष बैठक घेऊन संवादही साधला होता. काल आंदोलक मोठ्या संख्येने सड्यावर जमा झाले होते. यावेळी आंदोलकांनी दुपारी सर्वेक्षणस्थळी घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पोलिसांनीही अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये काहीशी झटापट होऊन आंदोलन चिघळले. यामुळे दिवसभर या परिसरात तणावाचे वातावरण होते. रिफायनरीविरोधी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केल्यानंतर आज सर्वेक्षणस्थळी आंदोलक फिरकले नसल्याने गेल्या पाच दिवसांपासून आंदोलकांच्या गजबजलेला सर्वेक्षणस्थळाच्या येथील सडा परिसर शांत झालेला दिसत होता.
-------
चौकट
३६ आंदोलकांना जामीन
दरम्यान, काल चिघळलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुमारे ७५ ते ८० महिला आंदोलकांना पोलिसांकडून तत्काळ मुक्त केले होते, तर सुमारे ३६ आंदोलकांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना वैयक्तिक जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT