कोकण

-बारसू पंचक्रोशीतील गावांमध्ये आजपासून जागृती

CD

३६ (पान ३ साठी)
-------
बारसू पंचक्रोशीतील गावांमध्ये जागृती

पोलिस अधीक्षक कुलकर्णी ; गैरसमज दूर करणार


रत्नागिरी, ता. २९ ः राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या माती परिक्षणाच्यावेळी मोठे आंदोलन करण्यात आले. मात्र कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीने बारसू परिसरातील सहा गावामध्ये जाऊन लोकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शनिवारी (ता. २९) मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बारसू गावातील आंदोलनकर्ते तसेच आजू बाजूच्या ग्रामीण भागात रिफायनरी प्रकल्पाबाबत खूप गैरसमज आहेत. या प्रकल्पाचे केवळ माती परिक्षण सुरू आहे. प्रकल्प सुरू झालेला नाही. मात्र गावातील नदीचे पाणी, परिसर नष्ट होण्यासारखे अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर होणे फार गरजेचे आहे. त्यासाठी शांततेच्या मार्गाचा अवलंब करून या ग्रामीण भागात लोकांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. यासाठी रविवारी (ता. ३०) बारसू येथील दोन गावात भेट देण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच बारसू प्रकल्पाच्या ठिकाणी शुक्रवारी (ता. २८) मनाई आदेशाचे उल्लंघन करण्यात आलेल्या १६४ आंदोलनकर्त्याना ताब्यात घेण्यात आले होते. त्यामध्ये ३६ पुरुषांचाही समावेश होता. त्यांना घरपर्यंत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हा पोलिस अधिकारी जयश्री गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
----
चौकट

सोशल मीडियावरही वॉच
आंदोलन दरम्यान सोशल मिडियाचा वापर करुन अनेक आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात येत आहेत. अद्यापही टाकल्या जात आहेत. पोलिसांनी लाठीहल्ला केला असल्याचेही मीडियातून बोलले जात आहे. याबाबत श्री. कुलकर्णी म्हणाले, आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून चांगली वागणूक देण्यात आली होती. हे ड्रोन कॅमेऱ्यातून स्पष्ट होत आहे. सोशल मीडियाद्वारे जनतेचा संभ्रम वाढविण्याचे काम होत आहे. त्यावरही पोलिस वॉच ठेवणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT