१३ (टुडे पान ३ साठी)
(३ मे टुडे तीन)
-rat९p७.jpg -
२३M०१६२१
प्रसाद अरविंद जोग
---------
धरू कास उद्योजकतेची..............लोगो
महिला उद्योजिकांसाठी ः न्यू होप-होममेड सोप
स्पर्धात्मक युगात उद्योगसंधी शोधणे हे आवाहन असते. कोणत्याही नवउद्योजकाला आपल्या उद्योगाची सुरवात करताना विविध अंगांचा विचार करावा लागतो, तसाच विचार ज्या वेळी गृहिणी उद्योग व्यवसायाची निवड करत असतात तेव्हा त्यांनाही तो करावा लागतो. उद्योग संधी शोधत असताना गृहिणींना आपल्याकडे उपलब्ध असणारा वेळ, आपली आवड, आपले कौशल्य व आपल्या प्रॉडक्टसना संभाव्य ग्राहक उपलब्ध होऊ शकतो का? याचा एकत्रित विचार करून उद्योजकीय अंगाने थोडासा वेगळा, नावीन्यपूर्ण व आशावादी निर्णय घेऊन उद्यमशीलतेला चालना द्यावी लागते. आज-काल गृहिणी आपलं घर, कुटुंब सांभाळून स्वतःच्या कलागुणांना, छंदांना वाव मिळावा म्हणून प्रयत्नशील असतात. काहीजणींना आपल्या कौशल्याचे, छंदाचे, विरंगुळ्याचे छोट्याशा उद्योगात रूपांतर करण्यात यश येते. कारण, त्या दूरदृष्टीने सुयोग्य उद्योगसंधींची निवड करत असतात. New Hope Brings New Scope या वाक्यानुसार नवीन आशा नवनवीन संधी निर्माण करून देणारी ठरू शकते. आजच्या लेखात आपण भविष्यात प्रचंड संधी निर्माण होऊ शकणाऱ्या व घरगुती स्वरूपात महिला उद्योजिकांना करता येऊ शकणाऱ्या होममेड सोप (घरगुती बनवलेले साबण) या विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
--प्रसाद जोग
-------
साबण उद्योग हा रासायनिक उद्योग आहे. तो मोठ्या प्रमाणात करता येऊ शकणारा भांडवलदारी उद्योगही आहे. असे उद्योग नामांकित कंपन्या साबणाच्या विविध ब्रॅण्डसाठी इतक्या वर्षांपासून स्वतःच्या मोठ्या फॅक्टरी सेटअपमधून तज्ञ रासायनिक अभियंते व तंत्रज्ञ यांच्या मदतीने करत आले आहेत. त्यांचे असे स्वतःचे मार्केट विकसित झालेले असून, साबण उत्पादन उद्योगात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. रोज नवनवीन साबणाचे ब्रॅण्डस् बाजारात येत आहेत, ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन आपला स्वतःचा होममेड सोपचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जिद्द, चिकाटी व दुर्दम्य इच्छाशक्ती व आशावादाची नितांत गरज आहे. साबण बनवण्याचे फॉर्म्युले शिकून घेऊन आपल्या अंगच्या सृजशीलतेने, कलात्मकतेने या व्यवसायात गृहिणीही आयुर्वेदिक साबण बनवून स्वतःचा छोटासा होममेड सोपचा व्यवसाय निश्चित चांगल्याप्रकारे करू शकतात.
प्रमाणित अभ्यासक्रम केल्यानंतर आपणही एकदा घरगुती स्वरूपात का होईना; पण साबण स्वतः बनवून पाहावेत, हे औत्सुक्य व नावीन्यपूर्ण सृजनाची हौस व घरच्यांची साथ याच्या बळावर सप्टेंबर २०१९ ला संपदाताईंनी होममेड सोप बनवण्याचा व्यवसाय चिपळूण येथील त्यांच्या राहत्या घरातूनच सुरू केला. आपल्या छंदातून, ज्ञानातून व केव्हीआयसीच्या कोर्समधून शिकलेल्या ज्ञानाचे उपयोजन करावे या स्वयंप्रेरणेतून व निव्वळ हौस म्हणून सुरू केलेला व्यवसाय आज चांगलाच जम धरू पाहत आहे. अल्पावधीतच सुदैवाने, त्यांचा हा ब्रॅण्ड लोकप्रिय झाला. जास्त कमर्शियल मार्केटिंग न करताही निव्वळ क्वालिटी प्रॉडक्ट म्हणून या प्रॉडक्टला ग्राहकांची छान पसंती मिळत आहे. यापासून प्रेरणा घेऊन अनेक महिलांनी पुढे येऊन प्रशिक्षण घेऊन लहान-मोठे व्यवसाय करावेत.
...
काय करावे व काय करू नये
हा उद्योग सुरू करण्याच्या आधीच आपण बनवत असलेल्या प्रॉडक्टसना मागणी आहे का? याचा मार्केट सर्व्हे करणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्योगाला मनात आले म्हणून कधीही सुरवात करून चालणार नाही. केवळ दोन चार व्हिडिओ बघून हा व्यवसाय करण्याच्या फंदात कोणी पडू नये. या उद्योग व्यवसायासाठी लागणारे योग्य ते ज्ञान, प्रमाणपत्र, अनुभव व योग्य ती लायसन्स घेऊनच या उद्योग व्यवसायात उतरावे. सुरवात छोट्या प्रमाणावर करावी. सुरक्षा व स्वच्छता महत्वाची. होममेड सोप असे आपण जरी म्हणत असलो तरी हा व्यवसाय करत असताना घरातील लहान मुलांना यापासून लांबच ठेवावे. केमिकलचा वापर करणे टाळावे. उच्च गुणवत्ता निकषांचा अवलंब करावा. या उद्योगात फॉर्म्युला सेट होईपर्यंत संयम ठेवणे गरजेचे असते. प्रोडक्ट डिझायनिंगकडे विशेष लक्ष द्यावे. आपण साबण हा फक्त ग्राहकांच्या एकाच गरजेसाठी बनवत नसून ग्राहकांच्या अभिरूचीचे विविध कांगोरे असू शकतात, याचा विचार करून तसे आपल्या होममेड सोपसचे पोझिशनिंग करण्याचा प्रयत्न करावा. व्यवसाय छोट्या प्रमाणात; पण प्रिमियम कॅटेगिरीसाठी करावयाचा असल्यास पर्सनलाईझ सोल्युशन्स व consultation देण्याचा प्रयत्न करावा. हा उद्योग सुरू करत असताना प्रॉडक्ट रेंज, प्रॉडक्ट पॅकेजिंग, प्रॉडक्ट डिस्प्ले, प्रॉडक्ट मार्केटिंग, कस्टमर निड Analysis कस्टमर रिलेशन व क्वालिटी Management साठी योग्य बिझनेस कन्सल्टंटची मदत घ्यावी.
*कोणकोणते आंघोळीचे साबण घरगुती स्वरूपात बनवता येऊ शकतात त्याची यादी
मिल्क सोप, चंदन सोप, कडूलिंब, हर्बल सोप, तुळशी सोप, पंचामृत सोप, गंगाजल सोप, विभूती सोप, चारकोल सोप, लेमन सोप, अलोवेरा सोप, वॉटर मेलन सोप, हनी अँड मिल्क सोप, हल्दी चंदन सोप, उटणे सोप, मुलतानी मिट्टी, पंचगव्य सोप, किड्स सोप, ब्युटी सोप, बदाम सोप, सोप फॉर ड्राय स्किन अँड सोप फॉर ऑईली स्किन
(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.