कोकण

रत्नागिरी-अंतिम टप्प्यात कॅनिंगचा दर 45 रुपये किलो

CD

पान ५ साठी)

अंतिम टप्प्यात कॅनिंगचा दर ४५ रुपये किलो
हापूस हंगाम अंतिम टप्प्यात ; दर आवाक्यात, पण आंबा कमी
रत्नागिरी, ता. १ : हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात फळाच्या आकारानुसार पेटीचा दर एक ते दीड हजार रुपयांपर्यंत आहे. तर कॅनिंगचा दरही ४० ते ४५ रुपये किलोपर्यंत घेतला जात आहे. दर आवाक्यात येऊ लागला असला तरीही उत्पादन कमी असल्यामुळे खवय्यांना यावर्षी हापूस मनसोक्त खाता आलेला नाही. अजून आठ दिवसात हंगामाची अखेर होईल असे बागायतदारांकडून सांगण्यात आले.
लहरी हवामान, अवेळी पाऊस, उन्हाची वाढलेली काईली यामुळे गतवर्षीच्या तुलनेत हापूसचा हंगाम १० ते १५ टक्केच राहिला. २० मेपर्यंत ५०० ते ७०० रुपये डझनने आंबा विकला जात होता. छोट्या आकाराचा हापूस साडेतिनशे ते पाचशे रुपयांनी विकला गेला. मेच्या अखेरीस हापूसचे भाव थोडे कमी झाले; परंतु आवक कमी झाली. दोन डझनचा हापूसचा खोका चारशे ते सहाशे रुपयांनी विकला जात होता. पेटीचा दर तर हापूसच्या आकारानुसार दीड हजार ते दोन हजार रुपये मुंबई मार्केटला विकला जात आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यातही हा दर कायम आहे. अनेक बागायतदारांकडून नेपाळी गुरखेही आंबा हंगाम संपत आल्याने गावी परतू लागले आहेत. काही मोजक्याच बागायतदारांकडील आंबा काढण्याचे काम शिल्लक आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात हापूसचा हंगाम संपेल. शिल्लक माल कॅनिंगला दिला जात असून त्याचा दरही किलोला ४० रुपये आहे. दरवर्षी हा दर २० ते २५ रुपयांपर्यंत असतो. पाऊस पडला की हापूसचा दर खाली घसरतो. हापूसप्रमाणेच पायरी आंब्यालाही मागणी असून, हा आंबाही यंदा कमी प्रमाणातच बाजारपेठेत उपलब्ध झाला. त्यामुळे हापूस इतकेच दर पायरीलाही मिळाले. बाजारपेठेतून यंदा पायरीही लवकरच गायब झाल्याचे पहायला मिळत आहे.

कोट
हापूस हंगाम संपत आला असून आणखी आठ दिवस चालेल. जुनच्या पहिल्याच आठवड्यात हापूस हंगाम संपणार असून दरही १००० ते १५०० रुपयांच्या दरम्यान राहणार आहे.
- निशांत सावंत, बागायतदार, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT