कोकण

हळवल गावातील वीज समस्या मार्गी लावा

CD

kan92.jpg
M08348
कणकवली : येथील महावितरण कार्यालयात वीज समस्यांबाबत तक्रारी मांडताना हळवल ग्रामस्थ. (छायाचित्र : मयुर ठाकूर)

हळवल गावातील वीज समस्या मार्गी लावा
ग्रामस्थांची मागणी : उपकार्यकारी अभियंता विलास बगाडे यांच्याशी चर्चा
कणकवली, ता. ९ : कणकवली शहरालगतच्या हळवल गावात पावसाळ्यात वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्या निर्माण होते. त्‍यामुळे पुढील चार दिवसांत हळवल गावातील वीज समस्या मार्गी लावा अन्यथा पुन्हा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा हळवल ग्रामस्थांनी दिला.
हळवल गावांत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्‍याच्या पार्श्वभूमीवर हळवल गावचे माजी उपसरपंच लक्ष्मण उर्फ प्रदिप गावडे, माजी सरपंच संतोष गुरव, प्रकाश पवार, मंगेश गावडे, भरत गावडे, दिपेश परब, सुदर्शन राणे, प्रशांत गावडे, शंकर परब, श्याम तांबे, आर्यन ठाकूर, संदीप गुरव, बाबू म्हाडेश्वर, उमेश परब यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विलास बगाडे यांची भेट घेतली. यावेळी या ग्रामस्थांनी हळवल गावात निर्माण होणाऱ्या वीज समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
गेल्‍या आठवड्यात फक्‍त पंधरा मिनिटे वादळी पाऊस झाला. त्‍यानंतर पुढील दोन दिवस हळवल वीज पुरवठा खंडित राहिला होता. ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरणला जाग आली आणि रात्रभर उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करावा लागला. तशी परिस्थिती पाऊस सुरू झाल्‍यानंतर होता नये, याची आधीच दक्षता घ्या अशीही मागणी ग्रामस्थांनी केली.
तालुक्‍यातील इतर गावांत वीज पुरवठा सुरू असतो. तर फक्‍त हळवल गावातील मेन लाईन फॉल्‍ट झाल्‍याचे महावितरणकडून सांगितले जाते. याखेरीज कधी विद्युत पोल पडतो, तर कधी वीज तारांवर झाडाच्या फांद्या कोसळतात अशी कारणे दिली जातात. आता मान्सून येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी आहे. या कालावधीत मुख्य वीज वाहिनी, ११ केव्हीची विद्युत वाहिनीवरील झाडांच्या फांद्या तोडण्यात याव्यात. भाकरवाडी, पवारवाडी, परबवाडी या तीन वाड्यांसाठी वेगळा फिडर निर्माण करा. हळवलचे वायरमन गवस हे ग्राहकांचा फोन उचलत नाहीत. सायंकाळी सात नंतर त्‍यांचा फोन बंद असतो अशीही तक्रार ग्रामस्थांनी केल्‍या.
या चर्चेनंतर उपकार्यकारी अभियंता बगाडे यांनी सोमवारी हळवल गावात कामगार पाठवून वीज तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्‍या जातील अशी ग्‍वाही दिली. जीर्ण झालेले विद्युत खांबही बदलले जातील. तर गावचा वायरमन आणि शाखा अभियंता यांना फोन उचलण्याबाबत सूचना दिल्‍या जातील, अशी ग्‍वाही दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT