कोकण

राजापूर- राजापुरात पावसामुळे विजेचा खेळखंडोबा

CD

फोटो ओळी
-rat११p२३.jpg- KOP23M08771 राजापूर ः मे महिन्यात केलेली धुळफेक पेरणी तुरळक पावसाच्या सरींना थंडावली आहे.


राजापुरात पावसामुळे विजेचा खेळखंडोबा
मान्सूनची प्रतीक्षाच ; वडदहसोळ पंचक्रोशी अंधारात
राजापूर, ता. ११ ः गेल्या काही दिवसांपासून सार्‍यांना मान्सूनची प्रतीक्षा आहे. मात्र बिपरजॉय चक्रीवादळाचे सावट सलग दुसर्‍या दिवशी दिसले. शनिवारी (ता. १०) दिवसभर आणि रात्री पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारी (ता. ११) सकाळीही तालुक्यामध्ये पावसाच्या सरी पडल्या. त्यानंतर दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. रात्री तालुक्यातील काही भागामध्ये गायब झालेली वीज आज सकाळी पुन्हा कार्यान्वित झाली होती. गेल्या चोवीस तासामध्ये तालुक्यात सरासरी ९.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाची सार्‍यांकडून वर्दी दिली जात आहे. तर, शेतकर्‍यांकडून पेरणीच्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी पावसाची प्रतिक्षा केली जात आहे. मात्र, जून महिन्याचे दहा दिवस उलटले तरी, अद्यापही मान्सूनच्या आगमन झालेले नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बिपरजॉय चक्रीवादळाचे सावट तालुक्यामध्ये दिसून येत आहे. शनिवारपासून पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. दिवसभर सातत्याने सरींवर पडणारा पाऊस रात्री जोरदार कोसळला. पावसाचा जोर रविवारी सकाळही कायम होता. मात्र दुपारनंतर पाऊस गायब झाला. या पावसामुळे तालुक्यामध्येही कुठेही नुकसान झालेले नाही. मात्र दिवसभर विजेचा खेळखंडोबा सुरू होता. ओणी विभागातील वडदहसोळ आणि अन्य काही गावांमधील पूर्णपणे वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे या भागातील लोकांना नाहक पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT