कोकण

ओस पडणाऱ्या गावांमुळे पटसंख्या घटती

CD

२५ ( पान २ )

ओस पडणाऱ्या गावांमुळे पटसंख्येत घट

मंडणगड तालुका; स्थलांतरामुळे २० शाळा बंद,१० शून्य शिक्षकी

सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १४ ः जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सिद्ध होत असतानाही रोजगारानिमित्त पूर्ण कुटुंब स्थलांतरित होत असल्याने गावे ओस पडू लागली आहेत. त्याचा परिणाम शाळांवर झाला असून, आतापर्यंत तालुक्यातील २० शाळा विद्यार्थी नसल्याने बंद झाल्या असून ५६ शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांमुळे १० शाळा या शून्य शिक्षकी झाल्या आहेत तसेच ६ शिक्षक व अधिकारी निवृत्त झाले आहेत. परिणामी, तालुक्याचे शैक्षणिक क्षेत्र कठीण परिस्थितीतून जात असून तालुक्यासाठी हा गंभीर विषय बनला आहे.
डिजिटल क्लासरूमसाठी शाळांतून पालक, ग्रामस्थ व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत ही सुविधा उपलब्ध केली आहे. लाखोंचे शैक्षणिक उठाव झाल्याने त्यामुळे शाळांचा गुणात्मक दर्जा वाढला असून शाळा सिद्धी श्रेणी उत्तम आहेत. विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ई-लर्निंग, दफ्तरविना शाळा, क्रीडा स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, निबंध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अभ्यासदौरे, क्षेत्रभेट, सहली आयोजित करून सर्वांगीण विकासावर भर दिला गेला आहे. या कामी शिक्षकवर्गांचे मोठे योगदान आहे तर दुसऱ्या बाजूला निसर्ग चक्रीवादळात जमीनदोस्त झालेल्या शाळांच्या इमारती अजून आहेत त्याच अवस्थेत आहेत.
--------------------
पटसंख्येअभावी बंद २० शाळा

तालुक्यातील २० शाळा पटसंख्येअभावी बंद झाल्या आहेत. यात नायणे, कबरगाणी, केरील, भामघर चौकी, तिडे गणवेवाडी, कोंझर धनगरवाडी, केळवत, पन्हळी बुद्रुक बौद्धवाडी, केंगवल, तुळशी बौद्धवाडी, तेरडी, बोलाडेवाडी, कुडुक खुर्द गुजरकोंड, कुडुक खुर्द रामवाडी, पिंपळगाव उर्दू, दहागाव नं.१, शिगवण, घराडी भुवडवाडी, तिडे निमदेवाडी या शाळांचा समावेश आहे.
-----

शून्य शिक्षकी झालेल्या १० शाळा -

उन्हवरे दहिंबे, सावरी भागडेवाडी, पणदेरी दंडनगरी, पणदेरी आदिवासीवाडी, बोरघर बौद्धवाडी, कांटे, वेसवी मराठी, टाकेडे नं.१, वलौते उर्दू, वेसवी टेकडी उर्दू.
---
शिक्षक स्थिती -
मराठी
पदनाम*मंजूर* कार्यरत* रिक्त
उपशिक्षक*२६४*१८८*७६
पदवीधर*९०*६९*२१

उर्दू
उपशिक्षक*४५*३३*१२
पदवीधर*१८*६*१२

----
दृष्टिक्षेपात मंडणगडची पटसंख्या
वर्ष*पटसंख्या*बंद शाळा
२०१८-१९*३८१२*५
२०१९-२०*३६२०*२
२०२०-२१*३५५९*४
२०२१-२२*३६०७*१
२०२२-२३*३३७६*२


कोट
बंद झालेल्या शाळांच्या गावातील कर्ती लोकसंख्या रोजगारासाठी स्थलांतरित झाली. स्थलांतर व जन्मस्थळे बदलल्याने पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होत आहे. तालुक्यासाठी शासनाचे रोजगार निर्मिती धोरण अपयशी असल्याचे स्पष्ट होते.
- रघुनाथ पोस्टुरे, समाजसेवक.
----
कोट

या वर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शून्य शिक्षकी शाळांवर कामगिरी शिक्षक नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या शाळा इतर शाळांप्रमाणे नियमित चालू राहणार आहेत. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

- एन. के. शिंदे, गटशिक्षणाधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT