कोकण

राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी घसरल्या

CD

पान ३

०९३७७
राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी घसरल्या
मंडणगड-म्हाप्रळ भाग; रस्त्यावरील चिखल तसाच
मंडणगड, ता. १४ ः आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर मंडणगड ते म्हाप्रळदरम्यान रस्त्याच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आल्याने चिखल तयार होऊन त्यावरून दिवसभरात दहा दुचाकी घसरून अपघात घडले. यामध्ये कोणाच्या पायाला, हाताला, कमरेला गंभीर दुखापती झाल्या आहेत. याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
महामार्गाच्या कामासाठी हा रस्ता सर्वत्र खोदून ठेवण्यात आला आहे. या संदर्भात पावसाळ्यापूर्वी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत शेतकरी संघर्ष समितीने वारंवार प्रशासनाला जागृत करत असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पहिल्याच पावसात मातीचा चिखल होऊन त्यावरून दुचाकी घसरून घटना घडत आहेत. कोठेही मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. वेगाबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना लावण्यात आलेल्या नाहीत. डायव्हर्शनबाबत फलक नसल्याने रस्ता कुठून सुरू, कोठे बंद हे समजून येत नाही. परिणामी, अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एखाद्या प्रवाशाचा जीव जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. धुत्रोली येथील वळणावर पाण्याचे नियोजन केले नसल्याने प्रचंड चिखल होऊन वाहने अडकून घसरून पडत आहेत; मात्र यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कोट
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या मार्गावर पावसापूर्वी उपाययोजना करून प्रवास सुरक्षित करावा यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे; मात्र यावर प्रशासनाने कोणतीही उचित कार्यवाही केली नाही. परिणामी, पाऊस सुरू झाल्याने या घटना घडत आहेत. याला सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार आहे.

- अविनाश दळवी, शेतकरी संघर्ष समिती प्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT