कोकण

पाण्याचे नळ चोरणाऱ्या संशयिताला पोलिस कोठडी

CD

पाण्याचे नळ चोरणाऱ्या
संशयिताला पोलिस कोठडी

कणकवली,ता. १४ ः जानवली आणि ओसरगाव परिसरामधील बंद घरातील पाण्याचे नळ चोरणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. शंकर नवलाप्पा पवार उर्फ कांबळे (वय ६०, मुळ रा. हिरज झोपडी, सोलापूर, सध्या रा. कणकवली) असे संशयिताचे नाव आहे. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
संशयिताने जानवलीत (ता.कणकवली) बहुतांशी इमारती, बंद घरे लक्ष केली होती. पाण्याचे किंमती नळ चोरून नेले होते. याबाबत डोंगरेवाडी येथील ६ मार्च २०२३ रोजी झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज सापडले होते. अॅड. अविनाश पाटील (रा. मुंबई) यांच्या घरातील नळचोरीस गेले होते. त्यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. दरम्यान, मंगळवारी (ता. १३) मध्यरात्री स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक महामार्गावर गस्त घालत असताना संशयित जानवली येथे महामार्ग लगतच्या एका प्रवाशी शेडमध्ये झोपल्याचे आढळले. त्याच्याकडे चौकशी केली असताना संशयिताची ओळख पटली. त्याला ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. संशयिताला याआधी एका खुनाच्या गुन्ह्यात दहा वर्षांची शिक्षा झाल्याचे तपासात समोर आले. पोलिस उपनिरीक्षक बापू खरात अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT