कोकण

फळ वाटप

CD

३१ (पान ५ साठी, संक्षिप्त)


मनसेच्या वतीने रुग्णांना फळ वाटप

दाभोळ ः मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या ५५व्या वाढदिवसानिमित्त दापोली तालुका व शहर मनसेच्यावतीने उपजिल्हा शासकीय रुग्णालय दापोली येथे रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले तसेच दातार वृद्धाश्रमात जेवण व बिस्किट वाटप करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष नितीन साठे, तालुका उपाध्यक्ष मिलिंद गोरिवले, तालुका उपाध्यक्ष रवींद्र धोपावकर, तालुका सचिव मयूर काते, अरविंद पुसाळकर, मनविसे उपजिल्हाध्यक्ष साईराज देसाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----

-rat१५p३७.jpg ः
२३M०९६०८
खेड ः येथील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल रोहित भोळे यांचा सत्कार करताना माजी विद्यार्थी वैद्य समीर तलाठी.
------------
श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलच्या
मुख्याध्यापकपदी रोहित भोळे

खेड ः येथील सहजीवन शिक्षणसंस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या मुख्याध्यापक पदी ज्येष्ठ संस्कृत शिक्षक रोहित भोळे यांची निवड झाली असून, विद्यालयात सन १९९४-९५ मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. खेड येथील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलमध्ये गेली अनेक वर्षे संस्कृत या विषयाचे अध्यापन करणाऱ्या रोहित भोळे यांची सहजीवन शिक्षणसंस्थेने मुख्याध्यापक पदी निवड केली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे नियोजन करून भोळे यांचा सपत्नीक सत्कार केला. या वेळी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलमधील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती म्हाडदळकर, श्रीमती पद्मा कुलकर्णी, भोळे व सन १९९४-९५ मध्ये प्रशालेत शिकलेले विद्यार्थी वैद्य समीर तलाठी, आशुतोष साळुंखे, अमित मेहता, मिनाक्षी निवाते, अभय पाटणे, कारेकर यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्यावतीने भोळे यांचा सत्कार करण्यात आला.
--

-rat१५p३८.jpg ः
२३M०९६०१
खेड ः शहरातील ब्रह्मकुमारीज लाईट हाऊस येथे शांतीयात्रेचा आरंभ करताना मान्यवर.
-----

खेडमध्ये ब्रह्मकुमारी विद्यालयातर्फे शांतीयात्रा

खेड ः येथील ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्यावतीने वाय २० प्रोग्राम-वॅाक फॅार पिस या युथविंगच्या उपक्रमाचे उद्घाटन सर्वधर्मिय व विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत झाले. या वेळी शहरातील विविध भागातून शांतीयात्रा काढण्यात आली. केंद्र सरकारच्या युवक व खेळ मंत्रालय यांच्या मार्गदर्शनानुसार नवीन युगाची विनायुद्ध सुरवात व्हावी यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून खेड येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शाखेतर्फे शांतीयात्रेचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे उद्घाटन उद्योजक अमोल बुटाला, ब्रह्मकुमारी गीता बहेन, दानिष्ता नाडकर यांच्यासह विविध शाळांतील शिक्षक, युवक विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी ब्रह्मकुमारी गीता बहेन यांनी सांगितले, शांतीपूर्ण विश्वाच्या दिशेने जग वाटचाल करावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विस्कळित झालेल्या वातावरणात शांतता पसरवण्याचा प्रयत्न आहे. एकाचवेळी संपूर्ण देशभरात शेकडो शांतीयात्रा आज काढण्यात आल्या आहेत. खेडमधील युवकांच्या शांतीयात्रेला सकाळी ६.३० वा. शहरातील महाडनाका येथील ब्रह्मकुमारी सेवाकेंद्रापासून सुरवात झाली. शहरातील बसस्थानकमार्गे पुन्हा महाडनाका येथील ब्रह्मकुमारीज लाईट हाऊस येथे ८.३० वा. शांतीयात्रेचा समारोप झाला.
----
-rat१५p४०.jpg
२३M०९६१४
ः खेड ः शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन स्वागत करताना मान्यवर .
---
कशेडी गावणकर शाळेत प्रवेशोत्सव

खेड ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशेडी गावणकर या शाळेत प्रवेशोत्सव हा कार्यक्रम अतिशय उत्साहात झाला. विद्यार्थ्यांची घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली. पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व औक्षण करून स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गावचे सरपंच संजय दरेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. या वेळी समीर मोरे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश पवार यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सरपंच दरेकर यांनी शाळेत नवीनच रूजू झालेले पदवीधर शिक्षक प्रभाकर कोळेकर व उपशिक्षक मनोहर पेंडखलकर यांचे स्वागत व सत्कार केला. या कार्यक्रमासाठी उपसरपंच सुशिला आंबेडे, जयश्री पवार, उपशिक्षिका मनिषा बैकर, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर यांनी केले, आभार उपशिक्षक मनोहर पेंडखलकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT