कोकण

पाण्याअभावी माडखोलमध्ये माड बागायतींचे नुकसान

CD

10136
माडखोल ः माड बागायतीच्या नुकसानीची पाहणी करताना सरपंच लाड व अन्य.

पाण्याअभावी माडखोलमध्ये
माड बागायतींचे नुकसान
सावंतवाडी ः यावर्षी माडखोल धरणाचे पाणी न सोडल्यामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सुपारी व नारळ माड बागायतीचे पाण्याअभावी नुकसान झाले. भरपाई देण्याची मागणी माडखोल येथील नारायण सुरेश राऊळ आणि प्रकाश पुंडलिक राऊळ या शेतकऱ्यांनी केली आहे. माडखोल येथील शेतकरी नारायण राऊळ यांची ६० नारळ आणि ७०० सुपारीची झाडे आहेत, तर प्रकाश राऊळ यांची ५० नारळाची झाडे आहेत. परिसरात अन्य शेतकऱ्यांचीही बागायती आहे. या भागात उन्हाळ्यात माडखोल धरणातील पाण्याचा पुरवठा होतो; मात्र यावर्षी धरणाचे पाणी न सोडल्यामुळे बागायतींचे नुकसान झाले. या नुकसानीची तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींनी पाहणी केली. यावेळी माडखोल माजी सरपंच संजय लाड, तलाठी उत्तम सावंत, ग्रामसेवक राऊळ, कृषी सहायक सुजाता पाटील, शेतकरी नारायण राऊळ, अनंत राऊळ, प्रकाश राऊळ आदी उपस्थित होते.
..............
सावंतवाडीत विविध योजनांची माहिती
सावंतवाडी ः ‘मोदी ॲट ९’ उपक्रमांतर्गत सावंतवाडीत आज भाजपतर्फे टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्या बैठकीला कर्नाटक भाजप प्रभारी निर्मल सुराणा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळातील विविध योजनांची माहिती देण्यात आली. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सुराणा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जनहिताच्या योजना तळागाळातील शेवटच्या व्यक्तींपर्यंत कशा पोहोचतील, याबाबत सुराणा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आगामी अभियानासंदर्भात चर्चा करण्यात आली. युवराज लखमराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बाळू देसाई, आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, विनोद सावंत, दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर, सचिन साटेलकर, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT