कोकण

सावंतवाडी रुग्णालय अधीक्षक धारेवर

CD

सावंतवाडी रुग्णालय अधीक्षक धारेवर

डॉक्टर प्रामाणिपणे काम करत नसल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः येथील उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार प्रशिक्षणार्थी डॉक्टराच्या हातात देण्यात आल्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. काही प्रशिक्षणार्थी डॉक्टर आपले काम प्रामाणिपणे करत नसल्याचा आरोप करीत आज येथील सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर आणि मनसेचे माजी शहर प्रमुख आशिष सुभेदार यांनी रुग्णालयाचे अधिक्षक संदिप सावंत यांना धारेवर धरले. या सर्व आरोपांचे त्यांनी खंडन करुन सर्व डॉक्टर प्रामाणिकपणे काम करीत आहेत, असा दावा केला.
माणगाव येथील एका व्यक्तीला सर्पदंश झाल्याने अधिक उपचारासाठी येथे आणण्यात आले. मात्र, याठिकाणी डॉक्टरांच्या वेळकाढूपणाचा संबंधित व्यक्तीला फटका बसला. ती व्यक्ती तब्बल तीन तास तशीच पडून होती, असे श्री. मसुरकर व सुभेदार यांचे म्हणणे आहे. याबाबत अधिक्षक डॉ. सावंत यांच्याशी संपर्क साधला असता उपचार करणार आहेत, असे त्यांनी सांगितले आणि ते त्या ठिकाणी दाखल झाले. या दोघांसह सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार यांनी रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले.
सर्व कारभार हा रामभरोसे चालला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत अधिक्षक सावंत यांना विचारले असता त्यांनी या गोष्टींचा साफ इन्कार केला आहे. जे डॉक्टर कार्यरत आहेत ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत. कोणीही वेळकाढू भूमिका घेत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर श्री. मसूरकर यांच्यासह सुभेदार व धारपवार यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. रुग्ण दगावण्याचे तसेच किरकोळ आजारी रुग्णाला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) पाठविण्याचे प्रकार सुरू आहेत. याकडे मंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT