कोकण

एमपीएसीत सहावी आलेल्या युवतीचा संशयास्पद मृत्यू

CD

एमपीएससीत उत्तीर्ण
तरुणीचा संशयास्पद मृत्यू
किल्ले राजगडच्या पायथ्याशी आढळला मृतदेह
वेल्हे, ता. १८ : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत सहावी आलेल्या तरुणीचा मृतदेह किल्ले राजगडच्या (ता. वेल्हे) पायथ्याशी रविवारी संशयास्पद अवस्थेत आढळला. हा मृत्यू आहे की घातपात?, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
दर्शना दत्ता पवार (वय २६) असे युवतीचे नाव आहे. ती मूळची नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कॉलनी, सहजानंदनगर येथील आहे. दर्शना एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावी आली होती. तिची ‘रेंज फॉरेस्ट ऑफिसर’ पदावर नुकतीच निवड झाली होती. दर्शना पुण्यातून १२ जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात दाखल होती. या घटनेबाबत वेल्हे पोलिस ठाण्यात तरुणीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे.
वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना नऊ जूनला पुण्यातील खासगी ॲकॅडमीमध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी आली होती. दुसऱ्या दिवशी कुटुंबीय दर्शनाला फोन करीत होते; परंतु तिने घरातील कोणाचेही फोन उचलले नाहीत. त्यामुळे तिच्या वडिलांनी १२ जूनला पुण्यात येऊन ॲकॅडमीत चौकशी केली. त्यावेळी दर्शना राजगड किल्ला फिरण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वडील आणि पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान, गुंजवणी ग्रामपंचायतचे सदस्य शिवाजी भोसले रविवारी सकाळी राजगडच्या पायथ्याशी सतीचा माळ परिसरात गेले होते. त्यांना तेथे दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी परिसरात पाहणी केली असता मृतदेह अर्धवट सडलेल्या स्थितीत आढळून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT