BJP esakal
कोकण

BJP Party : झिरोतून हिरो होण्यासाठी भाजपने कोकणात कसली कंबर

लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

मुझफ्फर खान

चिपळूण - लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नवनिर्वाचित प्रमुखांवर लोकसभा व विधानसभा मतदार संघनिहाय पक्ष संघटनात्मक वाढीसाठी जबाबदारी सोपवल्या आहेत. कोकणात पूर्वी भाजप झिरो होता; पण शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदा घेत कोकणात हिरो होण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

रायगडसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपची अनेक वर्षापासून राजकीय ताकद नगण्य होती. शहरातील नेते सोडले तर ग्रामीण भागात बोटावर मोजण्याइतपत कार्यकर्ते होते. त्यामुळे लोकसभा मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर युतीच्या जागावाटपात रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा नेहमी शिवसेनेच्या वाट्यात येत होती.

शिवसेनेचाच उमेदवार येथून निवडून येत होता; मात्र नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. नंतर दोनवेळा शिवसेनेचे विनायक राऊत खासदार झाले. रायगड मतदार संघातून अनंत गीते सलग दोनवेळा शिवसेनेचे खासदार झाले. नंतर ही जागा राष्ट्रवादीने मिळवली. देशात गेली नऊ वर्षे भाजपची सत्ता आहे.

देश आणि राज्यातील सत्तेचा फायदा घेत भाजपने पक्षाचा विस्तार करण्यासाठी गल्ली ते दिल्ली, असे धोरण ठेवले आहे. सर्वत्र भाजप हे सूत्र ठेवून या पक्षाची वाटचाल सुरू आहे. मागील वर्षभरात या मतदार संघात केंद्रातील मंत्र्यांचे दौरे झाले. नंतर केंद्र आणि राज्यातील पदाधिकाऱ्यांचे दौरे झाले.

अडीच वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेपासून भाजप लांब होती. शिवसेनेत फूट पडली. त्याचे परिणाम कोकणातही उमटले. आमदार उदय सामंत, दीपक केसरकर, योगेश कदम ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना कमकुवत झाली आहे. त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये उचलण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे.

आगामी काळात निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सर्व शक्तीचा वापर करेल, हे सर्वश्रुत आहे; परंतु शिस्तीचा आणि सुसंस्कृत नेत्यांचा पक्ष म्हणून भाजपला जनसामान्यांमध्ये किती स्थान मिळेल, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.

पक्षाने अतिशय योग्य पद्धतीने पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. त्यामुळे आगामी काळात संघटना वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. आम्ही बूथ कमिट्यांपर्यंत जाऊन संघटना बांधणीसाठी प्रयत्न करणार आहोत. भाजपकडे कार्यकर्त्यांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहचत आहोत.

- आशिष खातू, शहरप्रमुख, चिपळूण भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT