rat३०p११.jpg-
M12813
रत्नागिरी : मोदी @ ९ अंतर्गत वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अभय वनवे यांचे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन. डावीकडून उमेश कुळकर्णी, विक्रम जैन, मनोज पाटणकर, डॉ. गोविंद भताने, मुन्ना चवंडे, मंदार सरपोतदार.१२८१३
-----------
उपेक्षितांना न्याय, मुंडे यांचे विचार पोहोचवा
डॉ. वनवे; वैद्यकीय आघाडीतर्फे रत्नागिरीत कार्यक्रम
रत्नागिरी, ता. ३० : उपेक्षित, वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी भाजपचे हात बळकट करा, असे आवाहन भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा दक्षिण रत्नागिरी जिल्हा प्रभारी डॉ. अभय वनवे यांनी केले.
जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन व जिल्हा पदाधिकारी, भाजपा वैद्यकीय आघाडी आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद मेळाव्यात बोलत होते. भाजपतर्फे मोदी @ ९ हे अभियान राबविण्यात येत आहे. रत्नागिरीत मेळावा घेऊन त्यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या डॉ. अभय वनवे हे २७ जूनपासून रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. या प्रवासात त्यांनी शहरातील अनेक डॉक्टर, नागरिक, वकिल, पत्रकार, शेत मजूर यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधला व मोदी सरकारने ९ वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. या दौऱ्यात एमईएस आयुर्वेदिक महाविद्यालय व योगिता डेंटल कॉलेजमध्ये भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यानंतर भाजपा वैद्यकीय आघाडीची रत्नागिरी जिल्ह्याची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन, डेंटल विंग प्रदेश अध्यक्ष डॉ. गोविंद भताने, जिल्हा भाजपचे जिल्हा संयोजक डॉ. अभय धुळप, सहसंयोजक, बालरोग तज्ञ डॉ. संतोष बेडेकर व जिल्ह्यातील डॉक्टर्स उपस्थित होते.
------------
चौकट १
अॅड. पटवर्धन यांना बळ देणार
भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन हे गेल्या ३५ वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठेने काम करत असून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पक्ष जीवंत ठेवला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. पक्षवाढीसाठी, जिल्हा अध्यक्ष अॅड. पटवर्धन यांचे हात बळकट करण्यासाठी वरिष्ठ नेतत्व सोबत आहे, असे मत या वेळी डॉ. वनवे यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.