कोकण

चिपळूण ः कळवंडे धरणाचे नव्याने केलेले पिचिंग खचले

CD

फोटो
- rat६p८.JPG - KOP२३M१४२५३ चिपळूण ः कळवंडे धरणाची सुरू असलेली दुरुस्ती.

कळवंडे धरणाचे नव्याने केलेले पिचिंग खचले

भाजप युवा मोर्चा ; कामाची चौकशी करून कारवाई करा

चिपळूण, ता. ६ ः तालुक्यातील कळवंडे धरणाचे नव्याने केलेले पिचिंग खचले असून ते काम निकृष्ट आहे. यात शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कामाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष मालप यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संतोष मालप यांनी दिलेल्या निवेदनुसार, कळवंडे लघु पाटबंधारे योजनेच्या माती बंधाऱ्याच्या आतील बाजूस भराव व पिचिंगचे काम (जीओ मेमरिंग) कार्यकारी अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग रत्नागिरी व उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग चिपळूण यांच्यामार्फत करण्यात आले आहे. हे काम सुमारे ६५ लाख इतक्या रकमेचे असून ते काम अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला देण्यात आले आहे. या कामाचा दर्जाचे निकृष्ट आहे. नवीन काम संपूर्ण ढासळून धरणाच्या तळातील पाणीसाठ्यात गेले आहे. हीच दुर्घटना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना व अतिवृष्टी चालू असताना घडली असती तर तिवरे धरणासारखी अतिशय गंभीर दुर्घटना झाली असती. त्यामुळे कळवंडे, कोंढे, शिरळ या गावातील अनेक जनतेचे प्राण जाऊन जीवित व वित्तहानी झाली असती. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी मालप यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT