कोकण

पाटबंधारे अभियंता श्रीमंगले यांचा धामापूर सरपंच, उपसरपंचांतर्फे सत्कार

CD

swt620.jpg
M14322
आंबडपालः कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांचा सत्कार करताना सरपंच मानसी परब. सोबत अन्य

पाटबंधारे अभियंता श्रीमंगले यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ः धामापूर तलाव ते मळापोई ओढ्यापर्यंतचे गाळ सफाईचे काम मार्गी लावल्याबद्दल धामापूर सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर यांनी गावाच्यावतीने सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांची विभागीय कार्यालय आंबडपाल (ता.कुडाळ) येथे सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला.
उपअभियंता पी. आर. पाटील, शाखा अभियंता रमेश जोशी, धामापूर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे, स्वप्निल नाईक, प्रा. महेश धामापूरकर, सामाजिक कार्यकर्ते महेश परब, बाबू तोरसकर आदी उपस्थित होते. यावेळी धामापूर तलावाशी संबंधित सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील उर्वरित अपेक्षित कामे पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये उर्वरित ओढा आणि मळापोईमधील गाळ काढणे, आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंती बांधणे, धामापूर तलावात येणाऱ्या ओढ्यांमधून तलावात गाळ येऊ नये म्हणून उपाययोजना करणे तसेच मुख्यत्वे करून तलावातील गाळ काढणे, धामापूर तलावात प्रदूषण मुक्त पॅडल बोट व इलेक्ट्रिक बोटींच्या सहाय्याने पर्यटकांसाठी बोटींग सुरू करणे यासह इतर जलसंधारणात्मक कामांबद्दल चर्चा करून ग्रामपंचायतच्यावतीने निवेदन देण्यात आले. उर्वरित सर्व कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, असे आश्वासन यावेळी श्रीमंगले यांनी दिले. जलयुक्त शिवार योजानेचा जास्तीत जास्त लाभ उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT