कोकण

गुहागर ः सरखेल कान्होजी आंग्रेंना अभिवादन

CD

rat६p३३.jpg ःOP२३M१४३५७ अलिबाग ः सरखेल कान्होजी आंग्रे यांना अभिवादन करताना भारतीय नौसेनेचे अधिकारी.

rat६p३४.jpg ः१४३५३ समाधी स्थळावर गीत गाऊन अभिवादन करताना सागरी सीमामंचचे कार्यकर्ते.

सरखेल कान्होजी आंग्रेंना अभिवादन

रत्नागिरीचे सुपुत्र ; सागरी सीमामंचतर्फे मोटरसायकल रॅली

गुहागर, ता. ६ ः स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ४ जुलैला अलिबाग येथे भारतीय नौसेना, जिल्हा प्रशासन व सागरी सीमामंच यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. या संस्थेतर्फे मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै या गावचे सुपुत्र असलेल्या कान्होजी आंग्रे यांनी सुरत ते गोवा या सागरी किनारपट्टीवर स्वराज्याचा भगवा फडकवला. इंग्रज, पोर्जुगीज, डच आणि फ्रेंच या परकीय आक्रमकांचे किनारपट्टीवरील वर्चस्व मोडित काढले. त्यांच्या अतुलनीय साहसाचे स्मरण व्हावे म्हणून भारतीय नौदलाने आपल्या पश्चिम विभागाला आयएनएस आंग्रे असे नाव दिले. दरवर्षी कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीला अलिबाग येथील त्यांच्या समाधीस्थळावर भारतीय नौदलाच्या आयएनएस आंग्रे विभागातील अधिकारी शासकीय इतमामात अभिवादन करण्यासाठी येतात. यावर्षी कान्होजीराजे आंग्रे यांच्या २९४व्या पुण्यतिथीनिमित्त अलिबाग येथील मुख्य कार्यक्रमाला कमांडंट आदित्य हाडा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते. कमांडर आदित्य हाडा यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्थळावर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. त्यानंतर पोलिसदलाने मानवंदना दिली. या वेळी मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, नौसेना, कमांडंट आदित्य हाडा, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट प्रशांत गोजरे, तटरक्षक दलाचे सहाय्यक अमोलकुमार मुसळे, माजी उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, आदी उपस्थित होते.
सागरी सीमामंच या संस्थेतर्फे अभिवादन समारंभानंतर मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला कमांडर आदित्य हाडा, रघुजीराजे आंग्रे व सागरी सीमामंचचे प्रांत संघटनमंत्री अनिकेत कोंडाजी यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. अलिबाग शहरातून ही रॅली कान्होजी आंग्रे यांच्या समाधीस्थळी पोचली. तेथे आजच्या काळात सागरी किनारपट्टीवरील आक्रमणे, आव्हाने आणि सुरक्षात्मक उपाय याबाबत तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले.


समाधीस्थळाला हवे संरक्षण
शहरातील आंग्रे समाधी स्थळ परिसराच्या पावित्र्याला काही महिन्यांपासून धक्का लागणारी कृत्ये घडत आहेत. त्यामुळे शहराच्या ऐतिहासिक प्रतिमेला तडा जात आहे, असे वादादित असणारे प्रकार थांबवण्यासाठी आंग्रे समाधी स्थळ येथे दोन सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत तसेच आंग्रे उद्यान नाव बदलून आंग्रे समाधी स्थळ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी दुर्गरक्षक सामाजिक संस्था अध्यक्ष सिद्धार्थ नाईक यांनी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हा पोलिसदेखील या परिसरावर नजर ठेवतील, असे आश्वासन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT