कोकण

-रत्नागिरी ः क्राईम पट्टा

CD

बॅंकेच्या जप्त मिळकतीवर
बेकायदेशीररित्या ताबा
रत्नागिरी ः बॅंकेने जप्त केलेल्या पानवल येथील जागेतील गार्डला मारहाण करून बेकायदेशीररित्या ताबा मिळवल्याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विश्वास कुंडाजी कडू, अन्य एक, निखिल विश्वास कडू अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. ४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पानवल येथील सर्व्हे नं. ६४ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पानवल येथील सर्व्हे नं. ६४ मधील प्लॉट नं. २ च्या जागेवर बॅंकेने जप्त केली आहे. या मिळकतीमध्ये राजेंद्र नारायण शिंदे यांना सिक्युरिटी गार्ड म्हणून बॅंकेने ठेवले आहे. संशयित निखिल विश्वास कडू यांचे घर नं. ९६३ व घर नं. ९७९ मिळकतीला असलेले लोखंडी गेटचे कुलूप तोडले व बॅंकेकडे ताब्यात असलेल्या मिळकतीमध्ये त्यांनी कारमधून बेकायदेशीररित्या प्रवेश केला. गार्ड शिंदे यांनी विरोध केला असता संशयितांनी शिवीगाळ केली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांच्याकडील आदेशाचे उल्लंघन केले तसेच बॅंकेच्या मालकीच्या मिळकतीच्या लोखंडी गेटचे कुलूप, घराचे कुलूप तोडुन नुकसान केले. या प्रकरणी फिर्यादी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.


मिरजोळेत हातभट्टीवर छापा
रत्नागिरी ः हातभट्टीच्या दारूसाठी लागणारे साहित्य तसेच गावठी दारू बाळगल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन धोंडू सकपाळ असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.५) सकाळी आठच्या सुमारास मिरजोळे-पाटीलवाडी येथे नदीकिनारी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित नदीकिनारी विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य, नवसागरमिश्रित कुजके रसायन तसेच हातभट्टीची दारू तयार करून जवळ बाळगल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.


माहेर संस्थेतील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः माहेर संस्था खेडशी येथे बेशुद्धावस्थेत आढळलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. पांडुरंग गोविंद लोहडे (वय७२, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) सकाळी पावणेनऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. लोहडे बेडवरून उठले नाहीत म्हणून खबर देणार यांनी माहेर संस्थेचे व्यवस्थापक अभिजित कांबळे यांना सांगितले. तत्काळ त्यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुचाकी चोरट्याने पळवली
देवरूख ः देवरूख माणिक चौक येथे रस्त्यालगत पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळवली. अज्ञात चोरट्याविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित मुंडेकर (रा. ओझरेखुर्द-मुंडेकरवाडी) यांनी दुचाकी (क्र. एमएच-०८, एबी-१७९९) ही माणिक चौक येथे रस्त्यालगत पार्क केली होती. ती चोरट्याने लांबवली. या प्रकरणी मुंडेकर यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरूख पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT