कोकण

लेख-पुरवणी लेख-सुधारित

CD

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते राजनजी साळवी वाढदिवस विशेष.....डोके

फोटो ओळी
rat८p१२.jpg
M14765
राजापूरः आमदार राजन साळवी यांचा कार्यअहवाल पाहताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.
rat८p१३.jpg
14766
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेताना आमदार राजन साळवी.
rat८p१४.jpg
M14767
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करताना आमदार राजन साळवी. या वेळी उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
rat८p१५.jpg
14768
आमदार डॉ. राजन साळवी.

इंट्रो

गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमीच समरस होणारे, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत धडपडत राहणारे एवढेच नव्हे तर अन्यायाला वाचा फोडताना ‘कमी तिथे आम्ही’ याप्रमाणे नेहमीच लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेले आमदार राजन साळवींना ‘सर्वसामान्यांचा नेता‘ म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या वर्षभरामध्ये शिवसेना संघटनेतर्गत झालेल्या पडझडीमध्ये राजन साळवी यांनी आपल्या कृतीतून पक्षनिष्ठा म्हणजे काय असतं, हे सार्‍यांना दाखवून दिले आहे. विविध स्वरूपांच्या झालेल्या चौकशींनाही सामोरे जात त्यांनी बिनधास्तपणा आणि निडरपणा दाखवला. असे अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेले शिवसेनेचे उपनेते आणि राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांचा रविवारी (ता. ९) वाढदिवस. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा...
- राजापूर प्रतिनिधी
----

निष्ठावान नेता

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदूत्ववादी विचारांनी प्रेरित झालेल्या राजन साळवींनी ऐन तारुण्याच्या उमेदीच्या काळात सर्व्हे खात्यामध्ये असलेली चाकोरीबद्ध नोकरी सोडली अन् एक सच्चा आणि हाडाचा शिवसैनिक म्हणून सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सेनेचा भगवा खांद्यावर घेतला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत सर्वसामान्य गोरगरीब, आबालवृद्धांपासून थोरा-मोठ्यापर्यंत सर्वांच्या हृदयात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले. त्याच जोरावर त्यांनी संघटनेमध्ये विविध पदे यशस्वीपणे भूषवताना जिल्ह्यामध्ये संघटनेचा पाया अधिक मजबूत करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. पद, प्रतिष्ठा, मानसन्मान, खुर्ची पदरी आल्यानंतर अनेकांचे व्यक्तीमत्व अहंभावाने भारल्याचे चित्र दिसते. त्याला साळवी अपवाद आहेत. सत्तेच्या मखरात बसून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रतिष्ठेची अंगावर असलेली झूल बाजूला सारून साळवी रस्त्यावर उतरल्याचे चित्र अनेकवेळा पाहायला मिळते.
विकासाच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करणे हे लोकप्रतिनिधींकडून लोकांनी अपेक्षा ठेवणे गैर नाही. त्यांनी ते सोडवलेही पाहिजेत; मात्र, त्याचवेळी धडाडी, धाडस आणि आपुलकीने भारलेला स्नेहही त्यांच्याकडून सर्वसामान्यांना अपेक्षित असतो. या सार्‍या गुणवैशिष्ट्यांना साळवी यांनी वेळोवेळी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खर्‍या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जनसंपर्काचा आदर्शवत वस्तूपाठ घालणार्‍या साळवी यांनी आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाच्या जोरावर स्वकियांसह विरोधकांमध्येही आपुलकीसह आदराचे नाते निर्माण केले आहे. सर्वोत्कृष्ट जिल्हाप्रमुख ते तिसर्‍यांदा राजापूरचे आमदार अशी कारकीर्द बहरलेल्या साळवी यांनी स्वतःच्या कारकिर्दीसह ज्यांनी साथ दिली, ज्यांच्यावर विश्‍वास टाकला अशा सहकार्‍यांची कारकीर्द बहरण्यासाठी दिलेल्या योगदानामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि आजपर्यंतच्या यशाचे गमक दडलेले दिसते. सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यायचा असो, विकासकामांचा पाठपुरावा वा कोरोना महामारी इतरांच्या सुखदुःखात स्वतःचे सुख शोधणारे राजन साळवी यांनी एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे.
गेल्या वर्षभरामध्ये शिवसेना संघटनेतर्गत झालेल्या पडझडीमध्ये राजन साळवी यांनी आपल्या कृतीतून पक्षनिष्ठा म्हणजे काय असतं, हे सार्‍यांना दाखवून दिले आहे. विविध प्रकारच्या चौकशांनाही सहजपणे सामोरे जाताना त्यांनी अंगी असलेले धारिष्ट्य आणि निडरपणा सार्‍यांना दाखवून दिला. अनेकांच्या संकटाच्या काळात बजावलेली गोष्टी सांगेन युक्तीच्या चार अशी भूमिका, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारा नेता, विविध सेवासुविधांच्या माध्यमातून बनलेले गरिबांचे देवदूत आमदार साळवींना दीर्घायुष्य लाभताना त्यांच्या बहरत्या कारकिर्दीचा आलेख भविष्यामध्ये असाच चढता राहो आणि सामाजिक सेवेचा कार्यविस्तार होण्यासाठी संघटनात्मक असो वा शासनदरबारी नवनवीन पदे मिळोत, हीच त्यांना वाढदिवशी सदिच्छा !

.............................

नावः राजन प्रभाकर साळवी
पत्ताः ’साहेब’, भूखंड क्र. २, महावितरण उपकेंद्राशेजारी, लघुउद्योग वसाहत, झाडगांव, खालचीआळी, रत्नागिरी
शिक्षणः पदवीधर कला शाखा

शिक्षण घेतलेली विद्यालये ः फाटक हायस्कूल, रत्नागिरी, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.
व्यावसायिक पार्श्वभूमी ः पदवी संपादन केल्यानंतर तत्काळ भूमी अभिलेख कार्यालय, रत्नागिरी येथे वरिष्ठ लिपिक या
पदाचा कार्यभार स्वीकारला; परंतु राजकीय क्षेत्रातून समाजसेवा करण्याच्या हेतूने अल्पावधीतच या पदाचा राजीनामा दिला.
---------------------------------

भूषवलेली पदे

प्रतोद ः विधीमंडळ कोकण विभाग
सदस्य ः कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

सदस्य सार्वजनिक उपक्रम समिती
सदस्य ः तदर्थ समिती
सदस्य ः राज्यस्तरीय दक्षता व सनियंत्रण समिती
अध्यक्ष ः जय महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी
अध्यक्ष ः (कै.) अण्णासाहेब सावंत सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी
जिल्हा संघटकः शिवसेनाप्रणित रिक्षासेना व शिवसंस्कार विद्यार्थी वाहतूकसेना
संस्थापकः शिव प्रतिष्ठान, रत्नागिरी

...........
राजकीय पार्श्वभूमी
* भारतीय विद्यार्थी सेना या संघटनेचे काम महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पाहिले व त्या वेळी समाजसेवेचे बाळकडू वरिष्ठ सहकारी, मार्गदर्शक तसेच संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून प्राप्त झाल्याने राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. भूमी अभिलेख कार्यालय, रत्नागिरी येथे वरिष्ठ लिपिक या पदाचा राजीनामा देऊन राजकारणामध्ये पाऊल टाकले. राजकारणामध्ये शिवसेना या संघटनेच्या माध्यमातून सक्रिय झाल्यानंतर रत्नागिरी शहरामध्ये शाखाप्रमुख व नंतर सलग तीनवेळा प्रभाग राखीव झाल्याने वेगवेगळ्या प्रतिकूल प्रभागातून मोठ्या मताधिक्क्याने नगरसेवक होण्याचा मान प्राप्त
* नगरपालिकेमध्ये शिवसेना-भाजप अल्प मतात असूनही रत्नागिरी व शिवसेनेच्या इतिहासामध्ये शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
* नगराध्यक्षपदाच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये रत्ननगरीमध्ये सिग्नल यंत्रणा, स्वा. विं. दा. सावरकर या रत्नागिरीसाठी भूषण ठरलेल्या नाट्यगृहाच्या कामाचा शुभारंभ. या वेळी तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडून या वैभवशाली नाट्यगृहाच्या संकल्पनेसाठी गौरव
* नगराध्यक्षपदाची कारकीर्द संपल्यानंतर इतरांना संधी देण्याच्या हेतूने नगर पालिका निवडणूक न लढवण्याचा निर्णय; परंतु, पक्षाकडून कामाची आक्रमक कार्यपद्धती पाहून आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिवसेना जिल्हाप्रमुख हे जबाबदारीचे पद देऊन कामाप्रती समाधान.
* शिवसेनेचा सलग पाच वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून लक्षवेधी कारकीर्द
* शिवसेना जिल्हाप्रमुख या आत्यंतिक महत्वाच्या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे सातही विधानसभा मतदार संघातून युतीचे आमदार निवडून आणण्यात निर्णायक भूमिका, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील बहुतांशी पंचायत समित्या, नगर पालिका, ग्रामपंचायती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व राखले.
-----
चौकट
आयुष्यातील अविस्मरणीय घटना
शिवसेना जिल्हाप्रमुख या पदाच्या कारकिर्दीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून १ लाख २५ हजार इतकी शिवसेनेची सभासद नोंदणी केल्याबद्दल २००४ ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जागतिक स्तरावर गौरवलेल्या शिवाजीपार्क, दादर येथील दसरा मेळाव्यामध्ये लाखोंच्या जनसमुदायासमोर देशातील शिवसेनेचा अद्वितीय जिल्हाप्रमुख म्हणून सन्मानाची ढाल देऊन झालेला सत्कार.
----

विविध क्षेत्रातील संस्थात्मक कार्य

सांस्कृतिकः राजापूर तालुक्यामध्ये तरुणाईला साद घालणारा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणार्‍या जिल्ह्यातील बहुचर्चित युवागंगा महोत्सवाचा शुभारंभ. शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिनाचे औचित्य साधून दरवर्षी महामृत्युंजय यज्ञ, श्री सत्यनारायण पूजा, महाप्रसाद रात्री महाराष्ट्राची मराठमोळी परंपरा जपणार्‍या मनोरंजनात्मक कार्यकमाचे आयोजन करून सामाजिक ऐक्य राखण्यावर जाणीवपूर्वक भर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न.
शैक्षणिकः शिवसेनाप्रमुख वशिवसेना कार्यप्रमुख यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून दरवर्षी ग्रामीण व शहरी शालेय विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश व शालेय साहित्यांच्या वाटपांचा उपकम
वैद्यकीयः स्वर्गीय माँ साहेब मीनाताई ठाकरे, शिवसेनाप्रमुख व शिवसेना कार्यप्रमुख यांच्याही वाढदिनाचे औचित्य साधून दरवर्षी मतदार संघामध्ये रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यांचे आयोजन
सामाजिकः जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर २४ तास गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून असंख्य जीवांचे प्राण वाचवताना चालू असलेली अहोरात्र सेवा ‘ना नफा, ना तोटा‘ या तत्त्वावर रत्नागिरीवासियांसाठी अव्याहतपणे चालू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT