कोकण

एका चुकीमुळे अनेक स्वप्नांचा विध्वंस

CD

14820
कणकवली : येथील एम.एम.हायस्कूलमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन करताना दिवाणी न्यायाधीश टी.एच. शेख.

एका चुकीमुळे अनेक स्वप्नांचा विध्वंस

न्यायाधीश टी.एच शेख; कणकवलीत कायदेविषयक मार्गदर्शन

कणकवली, ता.८ : तरुणाईच्या या वयात आपल्‍या हातून घडणारी एक चूक आपल्‍यासोबतच अनेकांच्या स्वप्नांचा विध्वंस करू शकते. त्‍यामुळे सोशल मीडिया तसेच शाळा, महाविद्यालय आणि कुटुंबात वावरताना विद्यार्थ्यांनी सजगता बाळगावी. तरच तुम्‍हाला उज्वल भविष्य घडवता येईल, असे आवाहन येथील दिवाणी न्यायाधीश टी.एच. शेख यांनी केले.
तालुका विधी सेवा कणकवली यांच्यावतीने शहरातील एस. एम. ज्‍युनिअर कॉलेजमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर झाले. यावेळी न्या.शेख यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यात त्‍यांनी तरुणाईकडून होणारे गुन्हे तसेच त्यांच्यावर होणारे अन्याय, त्‍यांच्यासाठी उपलब्‍ध असणारी कायदेशीर मदत याविषयी सविस्तर माहिती दिली. ॲड. विष्णू पाताडे यांनी ‘बाल न्याय काळजी आणि संरक्षण कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. चैताली मुंज यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ विषयावर मार्गदर्शन केले. तर ॲड. संयोगिता राणे यांनी ‘मुलांचे हक्क’ विषयावर माहिती दिली. या कार्यक्रमाला कणकवली शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. सूर्यकांत तायशेटे, सचिव श्‍याम नलावडे, उपकार्याध्यक्ष श्री. काणेकर, प्राचार्य जी. एन. बोडके, उपप्राचार्य आर. एल. प्रधान आदी उपस्थित होते. एम. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आर. एल. प्रधान यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT