मानसिक रुग्णांनी अनुभवावे
घरगुती वातावरणः सामंत
रत्नागिरी, ता. ८ ः प्रादेशिक मनोरुग्णालयात येणारे रुग्ण हे त्यांच्या शारीरिक, मानसिक स्थितीमुळे भरती झालेले असतात. या रुग्णांची अवहेलना होऊ नये. डॉक्टरांनी त्यांना प्रयत्नपूर्वक घरगुती वातावरणाचा अनुभव द्यावा, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एम. कलगुटकी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओठणकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, या रुग्णालयाचा दुरुस्ती तसेच सुधारणाविषयक कामांकरिता २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयालय स्तरावर पाठवावा. त्याचा आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही देऊन या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये १६१ रुग्णभरती असून त्यांच्यासाठी उद्यापासून सकाळच्या न्याहरीमध्ये दुधाचा समावेश करण्यात यावा, असे आदेश त्यांनी या वेळी दिले.
या रुग्णालयाच्या सुधारणाकरिता जिल्हा नियोजनमधून सुमारे एक कोटी ८० लाख रुपये मिळाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक कलगुटकी यांनी दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन तेथील मंजूर व पेंडिंग वैद्यकीय बिलांचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी वैद्यकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले उपस्थित होते. आज दिवसभराच्या मॅरेथॉन दौऱ्यात पालकमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालय (माहिला रुग्णालय), प्रादेशिक मनोरुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटल येथील इमारत पाहणी करून या सर्वांचा आढावा घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.