कोकण

वेंगुर्लेचा दिशम परब ‘डान्सिंग सुपरस्टार’

CD

15168
कुडाळ ः ‘सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार’ स्पर्धेचे उद्‍घाटन करताना नीलेश आळवे. शेजारी सुनील भोगटे, बंड्या जोशी, अजय सावंत, रवी कुडाळकर, नागेश नेमळेकर, विलास कुडाळकर आदी.

वेंगुर्लेचा दिशम परब ‘डान्सिंग सुपरस्टार’

कुडाळातील स्पर्धा; जिल्ह्यातील ६१ नृत्य कलाकारांचा सहभाग

कुडाळ, १० ः चिमणी पाखरं डान्स अॅकॅडमी व आळवे फरसाण स्वीटस् यांच्यावतीने येथील मराठा समाज हॉलमध्ये आयोजित ‘सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार’ स्पर्धेत वेंगुर्ले-तुळस येथील दिशम परब विजेता ठरला. साक्षी परब, सीमा चव्हाण, पूर्वी गावडे आदींनी विविध गटांत विजेतेपद पटकावले.
डान्स रिॲलिटी शोच्या धर्तीवर झालेली ही स्पर्धा जिल्ह्यातील उदयोन्मुख नृत्य कलाकारांसासाठी गेला महिनाभर सुरू होती. यात जिल्ह्यातील तब्बल ६१ नृत्य कलाकारांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा चार फेऱ्यांमध्ये झाली. अंतिम फेरी उत्कंठावर्धक ठरली. एकूण तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा गटनिहाय अनुक्रमे निकाल असा ः लहान गट-पूर्वी गावडे (गोवेरी), नयना डागूर (पिंगुळी), स्फूर्ती खांबले (पिंगुळी), उत्तेजनार्थ-श्रीहरी बालटकर, युतिका सावंत, हर्षदा धर्णे. मध्यम गट-सीमा चव्हाण (म्हापण), वीरा पारकर (देवगड), दुर्वा चव्हाण (कणकवली), उत्तेजनार्थ-प्राची जाधव, श्रावणी जाधव, हर्षद परब. मोठा गट- साक्षी परब (घावनाळे), विशाखा धामापूरकर (नेरुर), तनिषा नाईक (नेरुर), उत्तेजनार्थ-यज्ञेश गायकवाड, साक्षी केदार, सानिका राऊळ. या सर्व विजेत्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार स्पर्धेचा सर्वोच्च किताब वेंगुर्ले-तुळस येथील दिशम परब याला देण्यात आला.
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्‍घाटन ‘आळवे फरसाण’चे सर्वेसर्वा नीलेश आळवे यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘चिमणी पाखरं’चे सल्लागार सुनील भोगटे, नागेश नेमळेकर, नीलेश जोशी, नगरसेवक विलास कुडाळकर, उद्योजक प्रसाद रेगे, अमित सामंत, ‘सकाळ’चे कुडाळ प्रतिनिधी अजय सावंत, कथ्थक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, अंकुश कुंभार, उमेश वेंगुर्लेकर, सतीश पावसकर, विनोद जाधव, साईप्रसाद सावंत, संजना परब, वेदिका सावंत, अजित कुडाळकर, रामचंद्र कुडाळकर, दीपाली परुळेकर, महेंद्र मातोंडकर, विठ्ठल तळवलकर, संचिता कोलापटे, डॉ. शेरावती शेट्टी, चिन्मय घोगळे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण तुळशीदास आर्लेकर, रोहित पाटील (रत्नागिरी), नृत्यांगना दीक्षा नाईक आणि रवी कुडाळकर यांनी केले. नागेश नेमळेकर, शुभम धुरी, नीलेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT