कोकण

दिलीप गुराम यांच्याकडून शालेय विद्यार्थिनीस मदत

CD

15166
कट्टा ः सिद्धी जांभवडेकर हिला मदत देताना दिलीप गुराम. सोबत मुख्याध्यापक संजय नाईक व अन्य.

दिलीप गुराम यांच्याकडून
शालेय विद्यार्थिनीस मदत
ओरोस ः गुरामवाडी (ता. मालवण) येथील रहिवाशी दिलीप गुराम (सध्या रा. मुंबई) यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीची होतकरू विद्यार्थिनी सिद्धी जांभवडेकर हिला आपले वडील (कै.) भाऊ गुराम यांच्या स्मरणार्थ दोन वर्षांच्या शैक्षणिक खर्चासाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. सिद्धीला दहावीच्या परीक्षेमध्ये ८० टक्के गुण मिळाले आहेत. नम्र आणि हुशार असलेल्या सिद्धीच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक पाठबळ मिळाल्याने तिच्या आईने व कुटुंबीयांनी गुराम यांचे आभार मानले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय नाईक व सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यापुढेही शाळेसाठी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी गुराम यांनी दिली. गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष व माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सुनील गुराम यांनी दिलीप गुराम यांना याबाबत आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दिलीप गुराम यांनी सिद्धीला सहकार्य केले. दिलीप गुराम यांनी यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नाईक यांचा सन्मान केला.
---
15224
मसुरे ः भरतगड प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

भरतगड इंग्लिश स्कूलमध्ये गुणगौरव
मालवण : माता काशिबाई मेमोरियल चॅरिटेबल स्ट्रस्ट संचालित भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल, मसुरे या प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्थाध्यक्ष प्रकाश परब यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष परब यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील मागील वर्षात राज्य, जिल्हा तसेच तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धांतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. कमिटी सदस्य बाबाजी भोगले, डॉ. वीणा मेहंदळे, जगदीश चव्हाण, पंढरीनाथ मसूरकर, तातू भोगले आदींसह पालक भिकाजी आंगणे, दिनेश बागवे, महेश मुळीक, विनोद चेंदवणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी चेअरमन संग्राम प्रभुगावकर, मुख्याध्यापक किशोर देऊलकर यांनी शुभेच्छा दिल्या. शिक्षिका पार्वती कोदे, गौतमी प्रभुगावकर, संजना प्रभुगावकर, सायली म्हाडगुत, संतोषी मांजरेकर, स्टेला लोबो, स्वरांजली ठाकूर, रसिका मेस्त्री, तनुश्री नाबर, सविता मेस्त्री, रेश्मा बोरकर तसेच कर्मचारी वसंत प्रभुगावकर, समीर सावंत, संतोष परब, करुणा चव्हाण, प्रिया पाटकर यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. संतोषी मांजरेकर यांनी सूत्रसंचालन केले. सायली म्हाडगुत यांनी आभार मानले.
---
15198
मधुसुदन नानिवडेकर

तळेरेत आज ‘मधुस्मृती’
तळेरे : तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ, संवाद परिवार तळेरे आणि प्रज्ञांगण तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध गझलकार, ज्येष्ठ कवी मधुसुदन नानिवडेकर यांच्या द्वितीय स्मृतीदिनाचे औचित्य साधून ‘मधुस्मृती’ या आदरांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या (ता. ११) दुपारी तीनला येथील वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद कुलकर्णी, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, वामनराव महाडिक विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, राजापूर अर्बन बॅंकेचे तळेरे शाखाधिकारी दुर्गेश बिर्जे, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या आदरांजली कार्यक्रमास सर्व नानिवडेकरप्रेमी, हितचिंतक, ग्रामस्थ तसेच पत्रकार संघाच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष डी. जे. मारकड, उपाध्यक्ष उदय दुधवडकर यांनी केले आहे.
--
कॅरम, बुद्धिबळ स्पर्धेत ८० जण
सावंतवाडी : येथील मुक्ताई अॅकॅडमीतर्फे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक सूर्यकांत पेडणेकर व सरोज पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मोफत कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सावंतवाडी, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, कणकवली तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कॅरम स्पर्धेत ६५, तर बुद्धिबळ स्पर्धेत ८० मुलामुलींनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्‍घाटन सावंतवाडी कारागृह अधिकारी संजय मयेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ, यश सावंत, गार्गी सावंत, राष्ट्रीय कॅरम खेळाडू साक्षी रामदूरकर, यशराज गवंडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मयेकर यांनी ॲकॅडमीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी ८ वर्षे कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिसच्या शालेय व असोसिएशनच्या स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर पारितोषिके प्राप्त करीत आहेत. मुक्ताई ॲकॅडमी राज्यातील बेस्ट ॲकॅडमी म्हणून गौरवांकीत असून हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार काढले. ॲकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा घेण्याचे जाहीर केले. आभार उपाध्यक्षा स्नेहा पेडणेकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT