कोकण

मुख्यालय बसस्थानकात चिखलाचा मुक्काम

CD

15170
सिंधुदुर्गनगरी ः येथील बसस्थानकात बैठक व्यवस्था नसून परिसराची झालेली अवस्था.

15163
सिंधुदुर्गनगरी ः येथील बसस्थानक परिसरात पडलेले खड्डे.

15171
सिंधुदुर्गनगरी ः येथील बसस्थानकात स्वच्छतागृहाची झालेली अवस्था.


मुख्यालय बसस्थानकात चिखलाचा मुक्काम

प्रवाशी हैराण; परिसराचे डांबरीकरण न झाल्याचा परिणाम

नंदकुमार आयरे ः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीचे बसस्थानक चिखलमय झाले असून येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सोयीपेक्षा गैरसोईचाच अधिक सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखलाचा तर उन्हाळ्यात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग केव्हा लक्ष देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सिंधुदुर्गनगरी येथे बसस्थानक व्हावे, सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा, शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची व्यवस्था व्हावी, यासाठी अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर सिंधुदुर्गनगरी एसटी बसस्थानक बांधण्यात आले. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते २७ जानेवारी २०१९ ला या बसस्थानकाचे उद्‍घाटन झाले. उद्‍घाटन होऊन पाच वर्षे लोटली तरी अद्यापही या बसस्थानकातील रस्ता व परिसराचे डांबरीकरण झालेले नाही. या बसस्थानकाची सद्यस्थिती पाहता येथील सोयी सुविधा, स्वच्छता आणि डागडुजीकडे एसटी प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसत आहेत.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा मुख्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक, शासकीय कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी या बसस्थानकावरून प्रवास करतात. याचे बांधकाम करताना झालेल्या काही चुकांमुळे पावसाळ्यात पाण्याचा त्रास व उन्हाळ्यात कडक उन्हाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या ठिकाणी पुरेशी बैठक व्यवस्थाही नाही. अस्वच्छ शौचालय, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि परिसर स्वच्छतेची समस्या कायम आहे. परिसरात अद्यापही डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे हे बसस्थानक सद्यस्थितीत चिखलमय बनले आहे. बसमध्ये चढताना व उतरताना प्रवाशांना चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे. एसटी प्रशासनाकडून केवळ प्रवासी वाहतूक केली जात असून प्रवाशांच्या सोयी सुविधेकडे मात्र दुर्लक्ष केले गेले आहे. तसेच पडलेले खड्डे आणि पावसाचे पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील सुविधेकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग केव्हा लक्ष देणार? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याबाबत कुडाळ आगार व्यवस्थापक, विभाग नियंत्रकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
---------
कोट
सिंधुदुर्गनगरी बसस्थानकाची निर्मिती प्रवाशांच्या सोयीसाठी झाली असली तरी प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शौचालय, बैठक व्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्या प्रवाशांना भेडसावत आहेत. याबाबत अनेकदा जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- सुशील निबरे, सामाजिक कार्यकर्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT